शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शहरालगतच्या ग्रा.पं.मध्ये सोलर पार्कची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:09 PM

ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते.

ठळक मुद्देपंकज भोयर यांची मागणी : पालकमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त राज्य सरकारने सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केला आहे. या विकास आराखड्यातून विविध विकासकामे होत असून शहरालगतच्या ग्रामपंचायतचे विद्युत देयक लक्षात घेता त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सोलर पार्कची निर्मिती करण्यात यावी, तसेच याचा समावेशही या विकास आराखड्यात करावा, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वर्धा शहरालगत नालवाडी, सेवाग्राम, पवनार, बोरगाव, वरुड, सिंदी (मेघे), पिपरी (मेघे),आलोडी, सालोड (हिरापूर), उमरी (मेघे), म्हसाला, सावंगी, आलोडी, साटोडा ही गावे आहेत. या भागात शहराचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे या ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते. विजेचे देयक वारेमाप येत असल्याने ते भरण्याची आर्थिक तजवीज ग्रामपंचायत नसते परिणामी अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होण्याची ग्रामपंचायतवर नामुष्की येते. वर्धा ही गांधी व विनोबांची कर्मभूमी असल्याने देशी विदेशी पर्यटक नेहमीच येथे येत असतात. महात्मा गांधींनी खेड्यांना स्वयंपूर्ण करण्यासह पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे. यासर्व बाबींचा विचार करुन शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये सोलर पार्कची निर्मिती करावी तसेच सेवाग्राम येथे ५ मेगाव्हॅटचा सोलरपार्क निर्माण करण्यात यावा. त्याकरिता १० एकर जागा आणि १० कोटी रुपयांची तरतूद सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करावी, असेही आमदार डॉ.पकंज भोयर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर