लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वेगळे विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राज्य शासनाच्या विविध खात्यामध्ये विदर्भात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. कारण विदर्भातील बहुसंख्य शासकीय पदावर, विदर्भाबाहेरील व्यक्तीच नेमले जातात. या व्यक्तींची पाळेमुळे विदर्भाबाहेर त्यांच्या मुळ परिसरात रूजलेली असल्याने या व्यक्ती लवकरच आपल्या परिसरात बदली करून घेतात. याचा परिणाम प्रशासनावर आणि जनतेवर होतो.विदर्भ महाराष्ट्रात जोडला त्यावेळी नागपूर कराराचा आधार घेण्यात आला होता. या नागपूर करारातील कलम ८ मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात याव्या. विदर्भाची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या २४ टक्के इतकी आहे. ही बाब लक्षात घेता एकूण नोकºयांच्या २४ टक्के जागा विदर्भाला मिळणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या ५८ वर्षात महाराष्ट्रात विदर्भातील बेरोजगारांना जेमतेम साडे तीन ते चार टक्के नोकºया प्राप्त झाल्या आहेत. आजही राज्यात २० लाखावर शासकीय पदे आहे. मात्र यातील विदर्भीयांना मिळालेल्या नोकºयांची आकडेवारी बघितल्यास ती ८० हजार पेक्षाही कमी भरते. हा विदर्भावर घोर अन्याय आहे. हा अन्याय विदर्भ महाराष्ट्रात सामील करून घेतला तेव्हापासून सुरूच आहे.विदर्भातील विद्यार्थ्यांना मागील २०१०-११ पासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. यापुर्वीही शासनास मोर्चाद्वारे व निवेदनाद्वारे थकीत शिष्यवृत्ती प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. विदर्भ राज्य होण्याबाबत आपणास सर्व अभ्यास आहेच. फजल अली यांच्या राज्य पुनर्रचना आयोगाने १९५६ ला विदर्भ हे वेगळे राज्य करा म्हणून भारत सरकारला अत्यंत महत्वाची शिफारस केली होती. एवढेच नाही तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फजल अली आयोगाला केलेल्या निवेदनात अतिशय सुस्पष्टपणे सूचित केले होते की, भाषेच्या आधारावर विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन मराठी भाषिक राज्य व्हावे. तेव्हाच त्यांचा समतोल विकास होईल. विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबई सारख्या राक्षसी प्रदेशामध्ये जोडल्यास त्याचा कधीच विकास होणार नाही. परंतु राज्यकर्त्यांनी या सुचनेचे विपरीत केले व विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग झाला.त्यामुळे आतापर्यंत होत असलेल्या अन्यायातून विदर्भाला सावरण्याकरिता आपण विदर्भपुत्र म्हणून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीचे अनिल जवादे, संदिप रघाटाटे, जयंता धोटे, अजय मुळे, शकील अहमद, रहमत खॉ पठाण, महेश माकडे यांनी केली आहे.
विदर्भ राज्याची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:58 PM
विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीची मागणी : नितीन गडकरी यांना दिले निवेदन