शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वर्धा पालिकेत बांधकाम परवानगी झाली आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:23 AM

राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

ठळक मुद्देराज्यातील पहिली नगर परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशानुसार वर्धा पालिकेमार्फत दोन महिन्यांपासून बीपीएमएस प्रणाली नगर रचना अधिनियम १९६६ प्रमाणे कार्य करते का, याची चाचणी सुरू होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर वर्धा नगर परिषदेने आॅनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी दिली. हा मान मिळविणारी वर्धा नगर परिषद राज्यातील पहिली ठरल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.बीपीएमएस प्रणालीमध्ये नागरिकांना आर्कीटेक्ट मार्फत बांधकाम परवानगीचा नकाशा सॉफ्टकॉपी मध्ये आॅनलाईन सादर करावा लागतो. बांधकाम परवानगी संबंधीत इतर माहिती व बांधकाम परवानगी शुल्क आॅनलाईन सादर करावे लागतात. सदर प्रणालीमार्फत नागरिकांना बांधकाम परवानगी दाखल करताना प्रस्तावमध्ये नगर रचना अधिनियम १९६६ प्रमाणे काही त्रूटी असल्यास बीपीएमएस प्रणाली नागरिकांना आधीच त्रूटी लक्षात आणून देते. जोपर्यंत प्रस्तावातील सर्व त्रूटी दूर होत नाही तोपर्यंत आॅनलाईन दाखल होत नाही. नगर परिषदेमार्फत बांधकाम परवानगीची पडताळणी झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या घरी संगणकावर बांधकाम परवानगी मिळेल. या आधी नागरिकांना बांधकाम परवानगीकरिता नगर परिषदेकडे अर्ज सादर करून प्रस्तावामध्ये त्रूटी असल्यास नगर परिषदेचे खेटे घ्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व घरबांधणीकरिता गृहकर्ज घेणाºया नागरिकांना विलंबास सामोरे जावे लागत होते.आॅनलाईन बांधकाम परवानगीमुळे बांधकाम परवानगी प्रक्रिया सोयी, सुविधेची व नागरिकांच्या वेळेची बचत करणारी होईल, असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व सर्व नगर सेवकांनी नगरपालिका प्रशासनाच्या ई गर्व्हनन्सच्या वाटचालीकरिता प्रशंसा केली आहे.बांधकाम परवानगी आॅनलाईन बीपीएमएस प्रणालीमार्फत देण्याकरिता मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याधिकारी यांनी नगर अभियंता सुधीर फरसोले, नगररचनाकार चुन्नीला झाडे, सहा. नगर रचनाकार दिनेश नेरकर, संगणक अभियंता अनुप अग्रवाल, महाआयटीचे संगणक अभियंता बिपीन गोटेकर यांनी उत्कृष्ट कार्य केले.अतिक्रमण हटविलेल्या जागांवर जॉगींग ट्रॅकशहरातील सर्व चाळीस खुल्या जागांवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. या जागा घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी वैशिष्टपूर्ण निधीतून ६ कोटी रुपये मंजूर केले आहे. या मोकळ्या केलेल्या जागेवर कायमस्वरूपी कुंपण, विद्युत व्यवस्था, जॉगींग ट्रॅक, पाणी व्यवस्था होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तराळे यांनी दिली.या कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील एकमेव जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा फिल्टर प्लँट व त्या परिसराच्या विकासाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.ट्राफिक सिग्नलची व्यवस्था होणारअल्पसंख्याक निधी अंतर्गत १.५ कोटीची कामे शहरात केली जात आहे. तसेच नगरोत्थान निधी अंतर्गत १.२४ कोटीची कामे ही होणार आहे. दलित वस्ती विकास निधी अंतर्गत २.७० कोटींची कामे शहरातील वाहतूक व्यवस्था ट्राफिक सिग्नल, विद्युत व्यवस्था सुधारणेसाठी करण्यात येणार आहे.