शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
2
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
4
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
5
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
6
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
7
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
8
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
9
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
10
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
11
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?
13
IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम
14
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका
15
श्रद्धाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? राहुल मोदीसोबत ब्रेकअपनंतर बिझनेसमनसोबत अफेअरची चर्चा
16
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
17
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
18
आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन
19
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
20
IND vs NZ : चूक कोणाची? ताळमेळ नसल्यानं सोपा झेल सुटला; पाकिस्तानसारखी फजिती, रोहित संतापला

चार वर्गांचा भार एकाच शिक्षिकेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:41 AM

देवळी पं.स.च्या नागझरी केंद्रातंर्गत असलेल्या जामणी येथील जि.प. शाळेत चार वर्ग आहेत; पण शिक्षिका एकच आहे.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : देवळी पं.स.च्या नागझरी केंद्रातंर्गत असलेल्या जामणी येथील जि.प. शाळेत चार वर्ग आहेत; पण शिक्षिका एकच आहे. परिणामी, चार वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसून ज्ञानदान करावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जामणी जि.प. शाळेत चार वर्ग आहे. शाळा २८ जूनपासून सुरू झाली असून अद्याप एकच शिक्षिका कार्यरत आहे. चारही वर्गांना एकच शिक्षिका शिकवित असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. चार वर्गांना शिकविताना सदर शिक्षिकेला कसरत करावी लागत आहे. शाळेची पटसंख्या २७ असून सर्व वर्गातील विद्यार्थी एकत्र बसवित असल्याचे दिसून आले. एकाच वर्गात बसत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यात पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना काय कळेल, हा प्रश्नच आहे. शिक्षक वाढविण्याकरिता अनेकदा शिक्षण विभागाकडे मागणी करण्यात आली; पण शिक्षक देण्यात आले नाही. आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. येथे किमान दोन शिक्षक देण्याची मागणी आहे.