ठळक मुद्देजिवितहानी नाही, परिसरही वाचला
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पुलगावकडून देवळीकडे जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या एम एच ४८ ए वाय ४८७६ क्रमांकाच्या रिकाम्या टँकरच्या केबिनला अचानक आग लागली. चालकाने सतर्कता दाखवत टँकर रस्त्याच्या बाजूला उतरविला व स्वत:चा जीव वाचवला. ही घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास देवळी-पुलगाव रोडवर जामनी शिवारात घडली.देवळी पोलिसांनी अग्निशमनाची गाडी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीची भीषणता इतकी होती की केबिन व दोन्ही टायर्स जळून खाक झाले. यात टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.