शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

बस व आॅटो चालकांत जुंपली

By admin | Published: April 12, 2015 1:49 AM

बसस्थानकावर बस वळवित असताना शुक्रवारी एका बसची आॅटोला डॅश लागली. यात बस व आॅटो चालकात शाब्दिक वाद झाला. वादानंतर दोघेही शांत झाले.

वर्धा : बसस्थानकावर बस वळवित असताना शुक्रवारी एका बसची आॅटोला डॅश लागली. यात बस व आॅटो चालकात शाब्दिक वाद झाला. वादानंतर दोघेही शांत झाले. यामुळे वाद निवळला असे वाटले होते. पण शनिवारी सकाळी त्या बसचा चालक स्थानकावर आला असता आॅटोचालकांनी त्याला मारहाण केली. तसेच बस चालकांनी आॅटो पलटविल्याचा आरोपही आॅटोचालकांनी केला. यासंदर्भात बस व आॅटो चालकांनी पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रार केली आहे.प्राप्त माहितीनुसार, बस चालक सुहास रघाटाटे हे बस घेवून स्थानकात येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आॅटोला त्यांची डॅश लागली. यात आॅटो चालकाने बस अडवून चालकाशी वाद घातला. दोघांत झालेला वाद शाब्दिक असल्याने तो थोडक्यात निवळला. दोघेही आपापल्या रस्त्याने निघून गेले. यामुळे हा वाद शांत झाला असे वाटत असताना हा वाद शनिवारी पुन्हा उफाळला. सकाळी धडक देणाऱ्या बसचा चालक सुहास रघाटाटे स्थानकात आला असता त्याला त्या आॅटो चालकाने मारहाण केली. यात तो जखमी झाला. त्यांनी घटनेची माहती बसस्थानकात दिली. काही बसचालक व वाहकांनी आॅटोस्टँडकडे येत दोन आॅटो पलटविल्याचा आरोप आॅटो चालकांनी केला. यामुळे बसस्थानक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होत. घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. आॅटोचालकांची नेहमीच अरेरावी होत असल्याचा आरोप चालकांनी केला. करण्यात या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अज्ञात आॅटो चालकावर कलम ३२४ अन्वये तर बसचालक व वाहकांवर ४२७ अन्वये कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)