शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

पुलाच्या अर्धवट बांधकामाने बससेवा बंद

By admin | Published: June 30, 2016 2:18 AM

हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती.

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल : बांधकाम विभागाची हलगर्जीसेलू : हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती. यामुळे तेथे उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. रहदारीसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला. त्या वळण रस्त्याचे खडीकरण करण्यात आले नाही. आता पावसामुळे रस्त्यावरून वाहनेच जाणे बंद झाले. परिणामी, बोरधरणला जाणारी बससेवाही हिंगणीपर्यंतच सिमीत करण्यात आली. यात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.बोर व्याघ्र प्रकल्प झाल्यानंतर बोरधरणचे महत्त्व वाढले. पर्यटकांची गर्दीही वाढली; पण या रस्त्यावरील पुलामुळे रहदारीलाच अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते; पण कासवगतीने काम सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून केलेला वळण रस्ता केवळ माती टाकून करण्यात आला. आता पावसामुळे तो रस्ता चिखलमय झाला आहे. तेथून वाहनचालकांना वाहनेच काढता येत नाहीत. अनेक दुचाकी चालक पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व वळण रस्ता खडीकरण, मजबुतीकरण करून मार्ग सुरळीत करावा, अशी मागणी राजेंद्र कोकाटे व ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)रहदारीही धोक्यातसेलू ते बोरधरण मार्गावर सध्या रहदारी वाढली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच हिंगणी ते बोरधरण दरम्यान पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने आणि वळण रस्त्याचे खडीकरण न केल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते रखडले. परिणामी, चिखलामुळे अपघात होत आहे. आता बससेवा बंद झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.