लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सायंकाळी उशीरा विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी रसुलाबाद मार्गे बस सुरू करण्याची मागणी पुलगाव आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. सदर प्रकरणी विद्यार्थ्यांचे हित जोपासून अखेर रसुलाबाद मार्गे बस सुरू करण्यात आली आहे.रसुलाबद परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुलगाव येथे येतात. सायंकाळी उशीर झाल्यास त्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बसच राहत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत होता. बहुदा विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत असे. सायंकाळी साडेपाच नंतर पुलगाव आगारने रसुलाबाद मार्गे वर्धा बसफेरी सुरू करण्याची मागणी प्रहारच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी केली होती. त्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पुलगाव आगार प्रमुखांनी सदर बस सुरू केली. रसुलाबादमध्ये बस दाखल होताच वाहक व चालक यांचे विद्यार्थ्यांनी पुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी पं.स. सदस्य अरूणा सावरकर, प्रहारचे तुषार खोंडे, बिटु रावेकर, तुषार वाघ, महेश साहू, गजू लोहकरे, निखील गोमासे आदींची उपस्थिती होती.
रसुलाबाद मार्गे बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:05 AM
सायंकाळी उशीरा विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी रसुलाबाद मार्गे बस सुरू करण्याची मागणी पुलगाव आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी झाली सुविधा : मागणीकडे होते परिवहनचे दुर्लक्ष