सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी वरुणराजाच्या अवकृपेमुळे सोयाबीनची आराजी बुडाली. हाती आलेल्या अत्यल्प पिकाला दिवाळीच्या दिवसात चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु बळीराज्याच्या गरजेचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनी केवळ २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांचे चांगलेच दिवाळे काढले. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या पिकाला कवडीमोल भावात विकताना शेतकऱ्यांच्या पापण्याआड पाणी डबडबले होते.या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पावसाने ते सर्व सोयाबीन ओले झाले. काहींना जागेवर कोंब आलीत. डोळ्या देखत होणारे नुकसान शेतकऱ्यांने जड अंत: करणाने सहन केले. सोयाबीन ओले झाल्यामुळे ते काळपट आले. मळणी केल्यानंतर काळे पडलेले सोयाबीन अत्यल्प दरात खरेदी करण्यासाठी व्यापारी डाव साधूनच होते. एकीकडे दिवाळीची धामधूम त्याकरिता शेतकऱ्यांना लागणारा पैसा या अडणीला हेरुन बसलेल्या गावागावातील लहान दलालांनी तुमच्या सोयाबीनचे ग्रेडेशन घटले, तुम्हाला आता योग्य भाव मिळणार नाही, अशी सोयाबीन उत्पादकांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. सणामुळे घरी किराणा, मुलाबाळांचे कपडे आदी चिंता शेतकऱ्यांना सतावत असल्याने त्यांनी नाईलाजास्तव मिळेल त्या दरात सोयाबीन विकून आपली दिवाळी साजरी केली. सोयाबीनला ३ हजार रुपयापासून ३ हजार ४०० रुपयापर्यंत दर असल्याचे सर्वश्रृत असतानाही लोभापोटी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगलेच लुबाडले.सोयाबीनचा कापणी खर्च एकरी २ हजार २०० आला आहे. मळणीकरिता मशीन वाल्याने २०० रुपये क्विंटलने काढणीचा खर्च घेतला. पिकाची आराजी सरासरी ३ ते ५ क्विंटल आली. पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च एकरी १२ हजार रुपये आहे. अशा स्थितीत शेतकºयांपुढे जगावे की मरावे, असा प्रश्न उभा ठाकत आहे.तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टरवर पेरणीआष्टी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. पावसामुळे ४ हजार हेक्टरवरील सोयाबीनची वाट लागली आहे. उर्वरीत ४ हजार ७५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाला सिंचनाची व्यवस्था होती. मात्र, भरपूर पाऊस झाल्यामुळे सर्व पीक निसर्गाच्या पाण्यावरच झाले. सततच्या पावसामुळे सरासरी ३ ते ५ क्विंटल एकरी उत्पन्न झाले आहे. तर आता परितीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर घातल्याने आता शेतकरी चिंतातूर आहे.शासनाकडून मदतीची मागणीशेतकºयांनी शासनाला वारंवार मागणी करून हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अद्यापही नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे झालेला नाही. शासकीय पातळीवरून आदेश नाही. अधिकारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे तीव्र असंतोष खदखदत आहे.यावर्षी सोयाबीन व कपाशी पिकाची अवस्था गंभीर आहे. शेतकºयांना आता आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शपथविधी झाल्यावर पहिली मागणी हीच लावून धरून शेतकºयांना अनुदान मिळेपर्यंत शासनदरबारी प्रयत्नशील राहणार आहे.दादाराव केचे, आमदार, आर्वी.
दिवाळीत बळीराजाचे व्यापाऱ्यांकडून दिवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 10:12 PM
या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पावसाने ते सर्व सोयाबीन ओले झाले. काहींना जागेवर कोंब आलीत. डोळ्या देखत होणारे नुकसान शेतकऱ्यांने जड अंत: करणाने सहन केले.
ठळक मुद्देहजार २०० रुपयात सोयाबीनची खरेदी