शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सेलूत १ हजार पोते तूर खरेदी

By admin | Published: April 24, 2017 12:17 AM

नाफेडच्या तूर खरेदीत असलेली संथगती व बारदाण्याच्या कमतरतेमुळे रखडलेल्या खरेदीतून काल टोकणप्राप्त शेतकरी व नाफेडचे अधिकारी यांच्यात वाद झाला.

दीड हजार पोते शिल्लक असताना खरेदी बंद सेलू : नाफेडच्या तूर खरेदीत असलेली संथगती व बारदाण्याच्या कमतरतेमुळे रखडलेल्या खरेदीतून काल टोकणप्राप्त शेतकरी व नाफेडचे अधिकारी यांच्यात वाद झाला. यात कृउबासचे सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, नायब तहसीलदार तीनघसे, ठाणेदार संजय बोढे यांनी मध्यस्थीने वाद निवळला होता. यानंतर रविवारी एक हजार पोते तूर खरेदी करण्यात आली. तर अजूनही टोकणप्राप्त २ हजार पोते तूर खरेदी अभावी पडून आहे. खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी सुरू करण्यात आली; परंतु तुरीची आवक असतानाही नाफेडच्या नियोजनशुन्य कारभारामुळे तूर खरेदीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. यातूनच काल टोकणप्राप्त अडीच हजार पोते तूर खरेदी अभावी तशीच पडून राहिली. आज १ हजार पोते खरेदी करीत दोन हजार पोते शिल्लक असताना खरेदी बंद केल्याने परत शेतकऱ्यात असंतोष पसरला. शेतकऱ्यांनी नाफोडच्यावतीने तूर खरेदी वाढवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवर शासन काय निर्णय घेणार हे सोमवारीच कळणार असून या निर्णयाकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहे.(तालुका प्रतिनिधी) बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर पडूनचनाफेडच्या तुर खरेदीत अनियमीतता व संथगती असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बारदाण्याची मागणी विहित मुदतीत केली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. शेतकऱ्याचा माल अजूनही कृउबास समितीच्या यादीत पडून असताना नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती विद्याधर वानखेडे व उपसभापती रामकृष्ण उमाटे यांनी सहा. निबंधक व जिल्हाधिकाऱ्याकडे नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. समीर कुणावार यांनी केल्या तात्काळ तूर खरेदीच्या सूचना हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी बंद केली होती. याची दखल घेत रविवारी आ. समीर कुणावार यांनी थेट बाजार समिती गाठत नाफेडच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत ताबडतोब तूर खरेदी करण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष प्रेम बंसतानी, उपाध्यक्ष चंदू मावळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.