लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग व साबाजी जिनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही जिनिंगमध्ये तीनशे क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ५८१५ रूपये भाव देण्यात आला.शुभारंभ प्रसंगी जिनिंगचे मालक मोहनलाल अग्रवाल, महेश अग्रवाल व दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते दोन्ही जिनिंगमध्ये काटापूजन करून कापूस उत्पादक कास्तकारांचा सत्कार करण्यात आला. कास्तकार वसीमखान तमीजखान पठाण, हरीभाऊ पाटणकर, मुद्दस्सर पठाण, सोमेश्वर कामडी व संजय निखाडे यांचा नारळ, दुपट्टा व रोख पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक सुशील तिवारी, दिनेश अग्रवाल, आदित्य बियाणी, बबलू काँकरीया, विनोद घिया, बंडु सुरकार, संदीप ढोक, अशोक हरणे, हरिष ओझा, अनिल ओझा तसेच शेतकऱ्यांची उपस्थित होती. सध्या कापूस निघण्यास सुरूवात झाली असून अनेक शेतकरी दिवाळीच्या तोंडावर कापूस विक्री करण्यासाठी जिनिंगमध्ये आणत आहे. त्यामुळे आवक वाढण्याची शक्यता आहे. तसेच देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदीदार मोठ्या प्रमाणावर असल्याने भाव सुध्दा तेजीत राहण्याची शक्यता आहे, असे जाणकार सांगतात.आशीर्वाद कॉटन येथे कापसाला ५८०३ रू. भावआर्वी- बाजार समितीमध्ये आशीर्वाद कॉटन कार्पोरेशन यांनी कापूस खरेदी शेतमाल शुभारंभ ५८०३ प्रति क्विंटल प्रमाणे केला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीदरापेक्षा ३५० ते ६०० रूपये जादा भाव देवून कापूस खरेदीस सुरूवात केली. खरेदी प्रारंभाला १४० क्विंटल आवक झाली. या वेळी बाजार समिती सभापती अॅड. दि.ना. काळे , सचिव वि.ना. कोटेवार व बाजार समितीचे व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. आशीर्वाद कॉटन कार्पोरेशन यांनी मंगळवारी कापसाला रू. ५८०३ प्रति क्विंटल भाव दिल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला.
साबाजी व श्रीकृष्ण जिनींगमध्ये कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:43 PM
स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग व साबाजी जिनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही जिनिंगमध्ये तीनशे क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ५८१५ रूपये भाव देण्यात आला.
ठळक मुद्दे३०० क्विंटल कापसाची खरेदी : प्रति क्विंटल ५८१५ रूपये भाव मिळाला