शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

कालव्याचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:49 PM

अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.

ठळक मुद्देतयार झाला जीवघेणा खड्डा : आष्टी-किन्हाळा मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी(शहीद) : अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.आष्टी-किन्हाळा हे अंतर अवघ्या सहा कि.मी.चे आहे. या रस्त्यावर अर्ध्यापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाने ये-जा करणाºयांना दगड तुडवतच पुढील प्रवास करावा लागतो. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हा रस्ता जि.प.च्या दोन सर्कलच्या हद्दीमध्ये विभागल्या गेल्यामुळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आष्टी येथे नगरपंचायत झाल्याने आता आष्टीचीही हद्द संपली आहे. सध्या लहान आर्वी हद्दीमध्येच पूर्ण रस्ता देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यास वारंवार टाळाटाळ केल्या जात असल्याची परिसरात ओरड आहे. त्यातच हे नवीन संकट ओढावल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या चना पिकाच्या पेरणीसाठी अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी कालव्याद्वारे सोडले आहे; पण या मौजामधील कालवे व पाटचºया नादुरूस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. इतकेच नव्हे तर आष्टी-किन्हाळा मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. दिवाकर भिवापुरे यांच्या शेताजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहामूळे रस्ताच वाहून गेला असून रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी अनिकेत मानकर, ऋषिकेश भिवापुरे, वैभव मुळे, आदेश डुकरे, विक्की ठाकरे, विकास डुकरे, आदेश भिवापुरे यांनी केली आहे.पाण्यातून करावी लागते ये-जाजलाशयातून सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी वितरीका नादुरूस्त असल्याने रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा तयार झाला आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. सध्या शेतकºयांकडून रबी हंगामातील विविध शेती कामे झटपट पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असला तरी या मार्गावरून ये-जा करणाºयांना पाण्यातूनच मार्ग काढत पुढील प्रवास करावा लागत आहे.