शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

अर्ज भरण्यासाठी गादी घेऊनच पोहोचले उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:40 AM

ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन सेंटरवर ठोकला मुक्काम : नाहक त्रासाला जावे लागते सामोरे

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आपला अर्ज कालावधीच्या आत भरता यावा म्हणून काही उमेदवारांनी गादी घेऊनच आॅनलाईन सेंटर गाठले. शिवाय मुक्कामही ठोकला.देवळी तालुक्यातील ६३ ग्रा.पं.पैकी ४६ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक तर एका ग्रा.पं.ची पोट निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारीसाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचा असल्याने इंटरनेट सेंटरवर गर्दी वाढली आहे. दुपारच्या सुमारास लिंक राहत नाही किंवा नेटची स्पीड कमी राहत असून रात्रीच स्पीड जास्त राहते, असा समज असल्यामुळे दिवस-रात्र इंटरनेट केंद्र सुरु असल्याचे दिसून येते. एका उमेदवाराला अर्ज भरताना जवळपास १९ मुद्द्यांची पुर्तता करावी लागत आहे. त्यातही इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार आता गादी घेऊन इंटरनेट सेंटरवर पोहोचत आहेत. रात्रभरही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहत असल्याने उमेदवार तेथेच झोपी जातात. ठरलेल्या यादीनुसार क्रमांक आला की त्यांना झोपेतून जागे करीत त्यांचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु केली जात आहे. सध्या इंटरनेट सेंटरवर दिवसरात्र एक करुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने रात्रीही दिवसाचाच अनुभव येत आहे. मात्र, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस असल्याने या किचकट प्रणालीत कितींचे अर्ज दाखल होतात व किंतींच्या अपेक्षेवर पाणी फेरतात, याकडेही स्थानिक राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.ग्रामपंचायतीला सुगीचे दिवसग्रामपंचायतींना एरवी कर वसुलीकरिता विविध उपाययोजना कराव्या लागतात. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडे ग्रामपंचायतचा कर थकीत नसावा, अशी अट असल्याने आता ईच्छुकांकडून कर भरल्या जात आहे. तसेच इतरही प्रमाणपत्राकरिता शुल्क वसुल केल्या जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक