शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 10:05 PM

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली.

ठळक मुद्देदाभोळकर व पानसरे हत्या प्रकरण : चार व अडीच वर्षानंतरही मारेकरी व सुत्रधार मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. याबाबत १९ आॅगस्ट रोजी मेनबत्ती पेटवून तर चार वर्षे पूर्ण झाल्याच्या; पण खुनी व सुत्रधार न मिळाल्याचा निषेध म्हणून सकाळी ८ वाजता ‘निर्भया मॉर्निंग वॉक’चे आयोजन करीत निषेध नोंदविण्यात आला.शनिवारी सायंकाळी डॉ. आंबेडकर ते गांधी पुतळा असा मार्च काढून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आदारांजली वाहून निषेध व्यक्त केला गेला. रविवारी हत्येला चार वर्षे पूर्ण होऊन सीबीआयने मारेकरी व सुत्रधार न पकडल्याचा तथा हत्यारे सनातन संस्थेचे साधक आहे, हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात देऊनही कार्यवाही न झाल्याने केंद्र व राज्य शासन तथा सीबीआयचा निषेध केला. सकाळी शिवाजी चौक ते बजाज चौक ते इतवारा येथून मार्च काढला. घोषणा देत व हातात निषेधाचे फलक घेऊन शिवाजी चौक येथे सांगता करण्यात आली. यात सुधीर पांगुळ, विलास काळे, डॉ. चेतना सवाई, बाबाराव किटे, डॉ. माधुरी झाडे, सारिका डेहनकर, अ‍ॅड. पूजा सुरकार, पोटदुखे, सुनील ढाले, प्रकाश कांबळे, गजेंद्र सुरकार, डफळे आदी सहभागी झाले.हिंसा रक्तात नसते, डोक्यात भरवली जातेजगात धार्मिक कारणांतून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्या आहे. हिंसेतून विनाशाशिवाय काही साध्य होत नाही. हिंसेचे अनेक स्वरूप असून हिंसा ही मानवाच्या रक्तात नसते तर ती वेगवेगळ्या कारणांमुळे डोक्यात भरवली जाते. हिंसा थांबवायची असेल तर समाजात न्याय व समता ही मानवी मूल्ये भक्कमपणे रूजविणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे प्रमुख किशोर जगताप यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात रविवारी ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अतिथी म्हणून अरुण चवडे, गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा व हिंसेचा जवळचा संबंध आहे, हे ओळखून वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना शहीद व्हाव लागलं. डॉक्टरांचं बलिदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी युवा पिढीला हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण व्यव्यस्थेत बदल करून हिंसेपासून प्रवृत्त करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करून मानवी मूल्ये रूजविणारी व्यवस्था उभी करणे व धर्मनिरपक्षेतेचे मूल्य भक्कमपणे रूजविण्यासाठी गरजही त्यांनी व्यक्त केली. हिंसेला नकार देण्यासाठीच संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाल्याचे ते बोलत होते. प्रास्ताविक सारिका डेहनकर यांनी केले.