वर्धा- वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणारी नरभक्षक वाघीण अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री अंभोरा शिवारातील यशोदा टेकाम यांच्या शेतात घडली.ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुडगूस घातलेल्या या वाघिणीने पाच जणांचा बळी घेतला होता. तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून हिंगणी वनपरिक्षेत्रातील बंद पडलेल्या आदिवासी आश्रमशाळेत ठेवले होते. मात्र या आश्रमशाळेतून तिने पळ काढला व सुसुंद शिवारात अनेक जनावरांची शिकार केली. ढगा भुवन भागात नीलगाईची शिकार करून तळेगाव आष्टी वनक्षेत्रात शेतात काम करणाºया शेतकºयाचाही बळी घेतला होता. वरुड येथे शेतात रखवालदार असलेल्या महिलेचा ती झोपडीबाहेर येताच नरडीचा घोट घेतला होता. नंतर काटोल, नरखेड, सावरगाव भागात दहशत निर्माण करणारी ही वाघीण काथलाबोडी गावातून अमरावती-नागपूर हायवे ओलांडून कावडीमेट, मेटिहरजी असा मार्गक्रमण करीत सिंदीविहिरी नजिकच्या अंभोरा येथे मूळ ठिकाणी परतली होती.ती शनिवारच्या पहाटे शेताभोवती जंगली श्वापदांपासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या वीजेच्या तारांमध्ये अडकून गतप्राण झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नरभक्षक वाघीण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 10:46 AM
वर्धा- वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणारी नरभक्षक वाघीण अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री अंभोरा शिवारातील यशोदा टेकाम यांच्या शेतात घडली.ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुडगूस घातलेल्या या वाघिणीने पाच जणांचा बळी घेतला होता. तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून हिंगणी वनपरिक्षेत्रातील बंद पडलेल्या आदिवासी आश्रमशाळेत ठेवले होते. मात्र ...
ठळक मुद्देअनेक जनावरे व पाच शेतकºयांचा बळीचार वेळा काढला शूटचा आदेश