लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद मार्गावर हळदगाव येथून कानकाटी शिवारातील हनुमान मंदिरात स्वंपाकासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला भरधाव असलेल्या ट्रकने धडक दिली. यात कारमधील आठ भाविक जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला.जखमींमध्ये रमेश लशकरे, वनिता लष्करे, पिक्की बोदळकर, नैतिक भोयर, मंगला गिरी, शोभा गिरी, पिक्की गोधरकर, यांचा समावेश असून काही जखमींची नावे कळू शकली नाही. हळदगाव येथील काही भाविक कारने कानकाटी येथील हनुमान मंदीरात दर्शनासाठी तसेच स्वयंपाक घेऊन जात होते. दरम्यान जामकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने कारला धडक दिली.सदर अपघात झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील जाम पोलीस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक पाटील, शंकर भोयर, सचिन गाढवे, कांचन नवाते, प्रवीण चव्हाण, दीपक जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.कार-दुचाकी अपघात; शिक्षक गंभीरसमुद्रपूर - शाळा संपल्यानंतर दुचाकीने घराकडे परतीचा प्रवास करणाºया शिक्षकाला भरधाव असलेल्या कारने धडक दिली. यात शिक्षक राजू सर्जेराव भोयर (४६) रा. हिंगणघाट हे जखमी झाले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. हा अपघात लसणपूर शिवारात झाला. धोंडगाव येथील सरस्वती विद्यालयातील शिक्षक राजू सर्जेराव भोयर हे शाळा सुटल्यानंतर एम.एच. ३२ टी. ५६५४ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी लसणपूर शिवारात आली असता समोरून येणाºया एम.एच. ३४ ए.ए. १६२९ क्रमांकाच्या कारने त्यांना जबर धडक दिली. यात राजू भोयर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कारला ट्रकची धडक, आठ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 9:45 PM