लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागून देवून योग्य माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्याकरिता विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिल्यात.खरीप हंगामातील पीककर्ज वाटप, कर्जमाफी, स्वंयरोजगार युवकांना कर्ज व उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शेतकरी व ग्राहकांच्या समस्येबाबत खासदार रामदास तडस यांनी बुधवारी जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विरेंद्र कुमार, एसबीआयचे जे.पी.मोहोंतो, अॅक्सीस बँकेचे सुरज माजरखेडे, आंध्रा बँकेचे गोपाल भुजबळ, बॅक ऑफ बडोदाचे प्रवीण कुमार व नितीन माउंडेकर, अलाहाबाद बँकेचे श्वेता मेश्राम, आयडीबीयचे सुशांत लोखंडे व आशिष पाटील, कॅनरा बँकचे ऐ.पी. मसखेडे, व्हीकेजीबीचे अविनाश आचार्य यांच्यासह इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामापूर्वी कमी कागदपत्रावर कर्ज पुरवठा करणे, कर्जमाफी झालेले शेतकरी तसेच कर्जमाफीमध्ये नाव असलेल्या शेतकºयांना त्वरीत कर्ज देणे, बँकेने शेतकऱ्यांची खाती असेट रिकव्हरी सेलला विकलेली असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामुळे अशा बँकांना सूचना देवून त्यांचे खाते नियमीत करणे, आत्मनिर्भर योजनेतून कर्ज वाटप, स्टँड अप, स्टार्टअप, मुद्रालोन अंतर्गत गरजुंना कर्जवाटप, उच्च शिक्षणाकरिता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना बँक कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे, आदी विषयावर चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे. मात्र, कागदपत्राचा ससेमिरा लावल्याने लॉकडाऊनच्या काळात कागदपत्रांची जुळवाजुळव करंताना शेतकऱ्याची दमछाक होत आहे. बँकामध्ये शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नाही, त्यांना सुलभतेने माहिती देण्यात यावी, त्यांना सातबारा व आठ बँकेतच उपलब्ध करुन द्यावा, असेही यावेळी खासदार तडस यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
पीककर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM
कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे.
ठळक मुद्देखासदारांनी घेतली बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक