शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

-तर राष्ट्रीयीकृत बँकांतील खाते बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली. सोबतच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता ‘मुद्रा लोण’ ही संकल्पणा मांडली. सरकारच्या या दोन्ही योजनांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद दिल्या जात नाही. या योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी आणि बेरोजगारांना बँकेकडून तुसडेपणाची वागणूक दिली जाते. ...

ठळक मुद्देजि.प. व न.प.कडून जिल्हाधिकाऱ्यांना अल्टिमेंटम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली. सोबतच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता ‘मुद्रा लोण’ ही संकल्पणा मांडली. सरकारच्या या दोन्ही योजनांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद दिल्या जात नाही. या योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी आणि बेरोजगारांना बँकेकडून तुसडेपणाची वागणूक दिली जाते. हा प्रकार थांबविण्याची मागणी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना केली. या प्रकाराकडे जर दुर्लक्ष झाले तर या दोन्ही स्वायत्त संस्था त्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत असलेले खाते बंद करणार, असा अल्टिमेटम त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.सध्या शेतीचा खरीपाचा हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांच्याकडून बँकेत कर्जाची मागणी होत आहे. ही मागणी करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवस्थापकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. शासनाने कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पण बँका त्यांना शिल्लक असलेले व्याज भरा असा सल्ला देत आहेत. जोपर्यंत कर्जखाते पूर्णत: निल होत नाही तोपर्यंत बँक कर्ज देणार नाही, अशी अट सांगत आहे. अशीच अवस्था मुद्रा योजनेची आहे. या दोन्ही योजनेबाबत संबंधित बँकांना निर्देश देण्याकरिता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंताणी, वर्धा बाजार समितीचे सभापती श्याम कारर्लेकर, भाजपाचे प्रशांत बुरले, सुनील गफाट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून चर्चा केली. या चर्चेच्यावेळी या समस्येवर येत्या तीन दिवसात जर तोडगा निघाला नाही तर दोन्ही स्वायत्त संस्थेच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकेतून सर्व खाते बंद करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.रोज ५० प्रकरणे मार्गी लावणारजिल्ह्यात खरीप कर्जाकरिता शेतकऱ्यांची चांगलीच परवड होत आहे. या संदर्भात रोज किमान ५० प्रकरणे मार्गी काढण्याची ताकीत देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शिष्टमंडळाला दिले.राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. राज्यकर्ते लोकोपयोगी निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या योजना सध्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या अनागोंदीमुळे कुचकामी ठरत आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हा परिषदेचेही राष्ट्रीयकृत बँकेतील खाते बंद करून खासगी बँकेत वळते करण्याचा निर्णय घेतला आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष जिल्हा परिषद, वर्धा.येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी शेतकरी आणि बेरोजगार युवकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता कुचराई करीत आहेत. यामुळे नगर परिषदेच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली. याकडे दुर्लक्ष झाल्यास नगर परिषदेचे सर्वच खाते खासगी बँकेत वळती करू.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा.