वर्धा : काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ, तसेच भाजपची याविषयी भूमिका, याची माहिती देण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. पण, त्यात कोविड नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून त्यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाचणगाव येथे कुठलीही विचारणा न करता, कोविड शिबिर सुरू केल्याचे सांगत आ. कांबळे यांनी आरोग्य अधिकारी आणि संबंधितांना शिवीगाळ केली होती. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
पत्रकार परिषदेला केवळ पाच व्यक्ती होत्या. पण, दबावतंत्राचा वापर करून माझ्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीच्या काळात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही पत्रकार परिषद घेतली. परंतु, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.- रामदास तडस, खासदार, वर्धा.