लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येत्या दिवसात नवरात्र सुरू होत आहे. या काळात वीज गेल्यास कामय करावे या बाबत चर्चा करण्याकरिता गेलेल्या शिवसेना प्रमुखासह इतरांवर कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण भागांमध्ये शेतकरी जास्त प्रमाणात असून पिकांना नैसर्गिक पाण्याने दांडी मारल्यामुळे शेतपिकाला पाणी मिळणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयावर या १६ तास भारनियमनाचे नवीन संकट निर्माण झाल्यामुळे भारनियमना संबंधित काही प्रश्नांचे उत्तर जसे वीज वितरण कंपनी ही सेवा देणारी कंपनी असून सेवा न देण्याचे कुठले कारण देऊ शकते का? विचारण्याकरिता शिवसेना जिल्हा प्रमुख वर्धा निलेश देशमुख व २२० वीज ग्राहक गावकरी देऊरवाडा सबस्टेशनवर गेले असता गावकºयांचे म्हणणे ऐकून न घेता दोन तास त्यांना खोटे बोलून बाहेर थांबविले व पोलिसांचा बंदोबस्त लाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व राजापूर, इटलापूर, देऊरवाडा, सर्कसपूर, टोणा, शिरपूर, नांदपूर, टाकरखेड, वाठोडा, बेनोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर इत्यादी गावातील २२० वीज ग्राहक गावकºयांवर १४३, ४५२, १८६ गुन्हे दाखल केले. या भारनियमन मनमानी विरोधात वीज ग्राहकांनी गुरुवारी मोर्चा आयोजित केला आहे.
मोर्चेकºयांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:02 AM
ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देवीज वितरण कंपनीची मुजोरी : शिवसेना जिल्हा प्रमुखांसह नागरिक ठाण्यात