लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. भुदान जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. या विषयी त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.विनोबा भावे यांनी भुदान चळवळी मध्ये जी शेतजमीन मिळविली. त्यातील काही जमीन गरजुंना वाटण्यात आल्यात; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांनी नसल्यामुळे या जमिनी तशाच पडून होत्या. शिल्लक असलेल्या जमिनीचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने जमिनी श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. सर्व भुुदानातील जमिनी देशातील भुमीहीन असलेल्या गरीबांना तसेच सरकारी कार्याकरिता मिळण्यात यावी. शिवाय झालेल्या भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत शुन्य प्रहर अंतर्गत केली. शिवाय तसा प्रश्नही उपस्थित करीत सर्वांचे लक्ष आल्याकडे वेधून घेतले.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ०७ मार्च १९५१ ला व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली (आजच्या तेलागंना) राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून केला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत गेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी आचार्य विनोबा भावे पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी पायदळ यात्रा करून लाखो एकर जमीन दानामध्ये दुर्लक्षित घटकांसाठी मिळविली. जे ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमिनीतून देशातील भूमिहीनांना जमिनी देण्यात आल्या व त्यातील जमीन शिल्लक राहिली. या शिल्लक जमिनी वाटपामध्ये मोठा भष्ट्राचार झाला आहे. भूदान मधील शिल्लक असलेल्या जमिनिचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. यासर्व भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खा. तडस यांनी लावून धरली होती.
भुदान जमीन घोटाळयाची सीबीआय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:11 AM
जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत.
ठळक मुद्देरामदास तडस यांची मागणी : लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्र्यांना घातले साकडे