प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्याचे स्थळ असलेल्या सेलू येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. पण तेथे पाहिजे ती यंत्रसामग्री नसल्याने कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तालुक्यातील गंभीर कोरोना बाधितांना सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण कोविडच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आणि तालुक्याच्या स्थळीच कोविड बाधितांवर उपचार व्हावे या हेतूने सेलूच्या ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने ५० खाटांचे कोविड केअर सेंटरचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड धावपळ झाली. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांच्या तुटवड्याला आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागले. कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करू पाहत असतानाच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ‘योग्य रेफर पद्धत’ कार्यान्वित केली. याच कार्यान्वित पद्धतीद्वारे तालुक्यातील अनेक गंभीर कोविड बाधितांना सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल करण्यात आले. पण कोविडची तिसरी लाट विदारक राहिल असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असल्याने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर, गॅस ऑक्सिजन प्लांटचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच हिरवीझेंडी मिळत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी आशा आहे.
तालुक्यात एक नगरपंचायत तर ६१ ग्रामपंचायती
सेलू रुग्णालयात सध्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर नाही. तर नुकत्याच तीन अधिक एक अशा एकूण चार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन प्राप्त झाल्या आहेत. क्रीडासंकुल किंवा शासकीय आयटीयाच्या इमारतीत सीसीसी सेंटर सुरू करण्याचे विचाराधीन आहे.सेलू शहरात नगरपंचायत कार्यान्वित असून तालुक्यात एकूण ६१ ग्रामपंचायती आहेत. सेलू ग्रामीण रुग्णालयात २०२० मध्ये डॉक्टरांसह इतर असे २४ एवढे मनुष्यबळ होते. तर नुकतेच दोन व्यक्तींची भरती करण्यात आली आहे. मात्र आणखी मनुष्यबळ लागणार आहे.सेलू येथील ग्रामीण रुग्णालयासोबतच गाव पातळीवरील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी तालुक्यातील दहेगाव गोसावी, सालई कला, सिंदी रेल्वे, हमदापूर, झडशीचे प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळत आहे. सेलू रुग्णालयाला अलिकडेच आधुनिक रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे.
केळझर येथे २० खाटांचे विलगीकरण केंद्र सुरूसिद्धीविनायक देवस्थान व ग्रा.पं. केळझर यांच्या पुढाकारातून लोकसहभागाने मंदिराच्या सभागृहात २० खाटांचे विलगीकरण केंद्र दुसरी लाट ओसरत असताना सुरू केले आहे. हे नियोजन तिसऱ्या लाटेला गृहीत धरून करण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयात कोविड बाधितांवर उपचार व्हावे या हेतूने ५० खाटांच्या कोविड रुग्णालयाचा तसेच गॅस ऑक्सिजन प्लांटचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यावर वेळीच विचार होईल, अशी अपेक्षा आहे.डॉ. पल्लवी खेडीकर (वांदिले), वैद्यकीय अधीक्षक, ग्रा. रु. सेलू.
ग्रामीण परिसराचा वाढता व्याप पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहे.- डॉ. स्वप्नील बेले, तालुका आरोग्य अधिकारी, सेलू.