प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काही महिन्यांचा कालावधी लोटताच केंद्र सरकारने वस्तुसेवा कर लागू केला. मात्र, दोन्ही निर्णय एकाच वर्षात घेण्यात आल्याने या भागातील बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार मंदावले असून बाजारपेठही मंदावली आहे. बुधवारी शहरातील बँक व एटीएमची पाहणी केली असता काही एटीएम बंद असल्याचे दिसून आले तर काही बँकेत रोकड टाकणाºयांची व काढणाºयांनी गर्दी केल्याचे दिसून आले.भारतीय स्टेट बँकेत फेरफटका मारला असता आर्थिक व्यवहाराचे दृष्टीने फारशी गर्दी दिसून आली. सेवानिवृत्तधारक व बँकेमार्फत वेतन मिळणारे कर्मचारी साधारणत: १ ते १० तारखेपर्यंत बँकेत हजेरी लावतात. तसेही कॅशलेस व्यवहार, बंद एटीएम, लिंक फेल, प्रिन्टर्स खराब असणे आदींचा नागरिकांना अजूनही त्रास सहन करावा लागत असल्याचे बघावयास मिळाले. बहूदा सणासुदीच्या दिवसात बँका बंद राहत असल्याने अनेकांना एटीएमच आधार असतो. परंतु, याच कालावधीत अवघ्या काही तासातच एटीएम कॅशलेस होत असल्याने रोकड असलेल्या एटीएमच्या शोधात अनेकांना शहराचा फेरफटकाच मारावा लागतो. ज्या एटीएममध्ये रोकड असते तेथे नागरिकांची लांबच लांब लागते. परिणामी, लागोपाठ शासकीय सुट्ट्या येणाºया दिवसांमध्ये तरी एटीएम मध्ये रोकड रहावी अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली.नोटाबंदीचा निर्णय देशहितार्थ असला तरी त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही. या काळ्या पैशाचा लाभ शेतकºयांना मिळाला तर खरी आर्थिक कोंडी सुटेल. काळ्या पैशाचा लाभ जनधन योजनेच्या माध्यमातून गरजूंना झाल्यास नोटाबंदीचे सार्थक होईल.- आर. एन. कोल्हे, ज्येष्ठ नागरिक, पुलगाव.नोटाबंदीमुळे आधीच बाजार पेठेवर आर्थिक परिणाम झाला. त्यातच याच वर्षात केंद्र शासनाने जीएसटी लागू केली. एकाच वर्षात घेतलेल्या या निर्णयामुळे व्यापारी वर्गाच्या आर्थिक व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.- स्वप्नील डाखोरे, व्यावसायिक, पुलगाव.
नोटबंदीमुळे आर्थिक व्यवहार मंदावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:11 AM
काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला.
ठळक मुद्देजनसामान्यांनाही फटका : जीएसटीही परिणामकारक