दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/ वर्धा: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. आश्रमात त्यांना फक्त नमस्कार करून स्वागत करण्यात आले. प्रथमच पारंपारिक पध्दतीला सुरक्षेचे कारण ठेवून स्वागताला फाटा देण्यात आला.आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.ऊन.प्रभू यांनी आदी निवास, बा कुटी,बापू कुटी महादेव कुटी इ ची माहिती दिली. आदी निवासाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपती व त्यांच्या पत्नी यांनी आदी निवास मध्ये ठेवलेल्या अंबर चरख्यावर सूत कताई केली.बापू कुटी मध्ये सर्व धर्म प्रार्थना झाली. महादेवभाई देसाई कुटीतील कपास से कपडा या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली.राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता आणि मुलगी यांनी महादेव कुटीतील अंबर चरख्यावर सूत कताई करून पाहिली .रोजच्या सूत कताईला येणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद पण साधला. .महादेवभाई देसाई कुटीसमोरील जागेवर राष्ट्रपती यांनी चंदनाचे झाड लावले. त्यावेळी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांचा परिचय टी.आर.एन.प्रभू यांनी करून दिला.आश्रम प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रपती यांनी लिहिला.यात सेवाग्राम आश्रमात येण्याचा विषय माझ्यासाठी सम्मान जनक आहे. गांधीजींची १५० वी जयंती आपण साजरी करीत आहोत. हे पवित्रस्थळ शांती,प्रेम, करूणा, दयाभाव व न्याय याचे जीवनातील सार्वभौम सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे. आश्रमची पवित्र भूमी राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. ज्यामुळे स्वातंत्र्यासाठी बळ मिळाले ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. बापूंनी जनसामान्यासाठी प्राथमिक शिक्षा, आरोग्य व स्वच्छता सह सामाजिक , आर्थिक ग्रामोत्थानाचे कार्याला प्रारंभ केला. या आश्रमात कुष्ठरोग निवारण कार्यक्रम सुरू केला .या रोगाच्या उन्मूलनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कामासाठी आज पण आम्हाला बापूंपासून प्रेरणा मिळत आहे. आपल्या देशवासियांसाठी समस्त मानव जातीकरिता शांती, प्रगती आणि समृध्दीच्या मार्गावर जाण्यासाठी आम्हाला सेवाग्राम आश्रम आणि बापूंचे जीवन गाथेमुळे सदैव मार्गदर्शन प्राप्त होत राहणार आहे. राष्ट्रपती यांनी आश्रमच्या अध्यक्षांना "महात्मा गांधी ए लाईफ थ्रू लेंसेस" हे पुस्तक इंग्रजी व हिंदी भाषेतील दिले.