लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.चंदेवाणी, जऊरवाडा, धर्ती या रस्त्याचे बांधकाम पाच वर्षापूर्वीच करण्यात आले आहे. या रस्त्याचे बांधकाम सदोष असल्यान सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिले आहे. तेव्हा कुणीही या कामाकडे लक्ष दिले नाही. कंत्राटदार व बांधकाम विभागाचे साटेलोटे असल्याने सदोष बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले. परिणामी निकृष्ठ बांधकामाचा फटका अल्पावधीतच परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाच वर्षातच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. सुरुवातीला रस्त्यावर लहान खड्डे पडल्याने ते दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. पण, संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने सततच्या वर्दळीमुळे ते खड्डे आता मोठे झाले आहे. रस्त्यावरील गिट्टी विखुरलेली असल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहे. यामुळे वाहनांचेही नुकसान होत असून वाहने पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे.या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालविणेही कठीण झाल्यामुळे एक खड्डा चुकविण्याच्या नादान दुसऱ्या खड्डयात वाहन आढळते. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खड्डयांमुळे व विखुरलेल्या गिट्टीमुळे वाहनचालक या रस्त्यावरुन जाण्याऐवजी बाजुने जाण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर रस्त्याच्या बाजुनेच वाहतूक होत असल्याने पांदणीचे रुप आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना याचा मोठा त्रास होणार असल्याने या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी या तिन्ही गावातील नागरिक करीत आहे.अपघाताचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये रोषगेल्या आठ दिवसात या मार्गावर खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकी धडकल्याने तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे. परंतु निद्रीस्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. त्यामुळे जीव गेल्यानंतरच कामाला करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चंदेवाणी, जऊरवाडा, धर्ती रस्त्याची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:10 PM
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देडागडुजीची प्रतीक्षा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष