लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या दरवर्षी मे महिन्यामध्ये व्हायच्या. परतु कोविड-१९ च्या प्रकोपामुळे शासनाच्या आदेशानुसार ही बदली प्रक्रिया जुलै महिन्यात राबविली जात आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेतील ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला २३ जुलैपासून सुरुवात होणार असून सुटीचे दिवस वगळता २६ जुलैपर्यत चालणार आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशाकीय बदलीचे प्रमाण ७.५ टक्के व विनंती बदलीचे प्रमाण ७.५ टक्के असून समानीकरणाकरिता टक्केवारी लागू राहणार नाहीत. तसेच रिक्तपदांचा समतोल साधण्यासाठी विनंती बदली करताना ज्या तालुक्यामध्ये पदांची कमतरता आहे, त्याच ठिकाणी विनंती बदल्या केल्या जाणार आहे. जास्त कर्मचारी असल्यास कमी कर्मचारी असलेल्या कार्यालयात विनंती बदली केली जाणार आहे. प्रशासकीय व विनंती बदली झाल्यानंतर समानीकरणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यानुसार तीन दिवस ही प्रक्रिया चालणार असून जिल्हा परिषदच्या सभागृहात याची व्यवस्था करण्यात आली आहे.विभागातील या कर्मचाºयांची होणार बदलीसामान्य प्रशासन विभाग : सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक (लिपिक), परिचर, बांधकाम विभाग : कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग : कनिष्ठ अभियंता, वित्त विभाग : सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लेखा), लघु पाटबंधरे विभाग : कनिष्ठ अभियंता, पंचायत विभाग : विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, महिला व बालकल्याण विभाग : अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षण विभाग (प्राथ.) : विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, पशुसंवर्धन विभाग : सहायक पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक, पट्टींबधक, कृषी विभाग : विस्तार अधिकारी (कृषी), कृषी अधिकारी, आरोग्य विभाग : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, औषधनिर्माण अधिकारीमे महिन्यामध्ये होणाºया सार्वत्रिक बदल्या कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाच्या आदेशानुसार आता केल्या जात आहे. २२ जुलैपासून जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथील सभागृहात सकाळी ११ वाजतापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे. प्रारंभी प्रशासकीय, विनंती बदल्यानंतर त्याच दिवशी समानीकरण बदली प्रक्रिया राबविली जाईल.विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा
जिल्हा परिषदेत आजपासून बदल्याचे पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 5:00 AM
जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशाकीय बदलीचे प्रमाण ७.५ टक्के व विनंती बदलीचे प्रमाण ७.५ टक्के असून समानीकरणाकरिता टक्केवारी लागू राहणार नाहीत.
ठळक मुद्देतीन दिवस चालणार प्रक्रिया : ११ विभागातील वर्ग ३, ४ च्या कर्मचाऱ्यांची धडपड