लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगात सध्याच्या काळात बदललेल्या जीवनपद्धतीमुळे समाजमन असंतुुलित झाले आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक व संशोधक समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबवित आहेत. त्यांच्या प्रकल्पातील निष्कर्ष व सुचविलेल्या उपाययोजनांने सामाजिक आरोग्य संतुलित ठेवण्यास योग्य ती मदत होऊ शकते. संशोधन प्रकल्पात सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी शासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे, असे मत पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठ रायपूरचे माजी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.डी. हेलोडे यांनी व्यक्त केले.यशवंत महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व इंडियन असोसिएशन आॅफ ह्युमन बिहेविअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. एआयएचबी या संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त यशवंत महाविद्यालयात ‘असंतुलित आधुनिक जीवनशैली व समुपदेशनाची भुमिका’ या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे बिजभाषण करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत तर प्रमुख पाहुणे हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. गिरीश्वर मिश्र, इंडियन असोसिएशन आॅफ हयुमन बिहेविअर, पुणेचे प्रा. सी.जी. देशपांडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विलास देशमुख, मानसशास्त्र विभागप्रमुख व परिषदेचे समन्वयक डॉ. के.पी. निंबाळकर उपस्थित होते.यावेळी बोलताना सतीश राऊत यांनी या परिषदेत सादर होणारे शोधनिबंध पुस्तकात बंद न राहता ते समाजाच्या उपयोगात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. सी.जी. देशपांडे यांनी पाठ्य पुस्तकावर आधारित ज्ञानापेक्षा कौशल्यावर आधारित वैज्ञानिक ज्ञानाकडे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. या संदर्भात नवनवे संशोधन करुन समाजहिताचे कार्य केले पाहिजे असा सल्ला उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना दिला. तर डॉ. मिश्र यांनी सांगितले की, मानवी जीवन नकारात्मक बाबींना जास्त स्वीकारत असून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त केली.डॉ. विलास देशमुख यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा सांगितली. तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले यांच्या मार्गदर्शनात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. मेधा कुमठेकर यांनी संस्थेच्या वाटचालीसंबंधी संपादित केलेल्या पुस्तकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.दोन दिवस चालणाºया या परिषदेला देशभरातील मानसशास्त्र, मानसोपचारक, प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या परिषदेतून ‘असंतुलित जीवनशैली व समुपदेशनाची महत्त्व व भुमिका’ याविषयी विविध पैलूने विचारमंथन होणार आहे. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. रवीशंकर मोर व डॉ. शिप्रा सिंगम यांनी केले. आभार डॉ. के.पी. निंबाळकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. दिलीप देशमुख, डॉ. उत्तम पारेकर, डॉ. विजय बोबडे, डॉ. आशा अग्निहोत्री, डॉ. विलास ढोणे, प्रा.एस. एम. खान, डॉ.पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. नरेश कवाडे, डॉ. नरेश खोडे, डॉ. संजय धोटे, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. दिलीप भुगुल, प्रा. बुद्धघोष लोहकरे, प्रा. संदीप रायबोले आदींनी सहकार्य केले.
बदलत्या जीवनशैलीने समाजमन असंतुलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:02 AM
जगात सध्याच्या काळात बदललेल्या जीवनपद्धतीमुळे समाजमन असंतुुलित झाले आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक व संशोधक समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबवित आहेत.
ठळक मुद्देआर.डी. हेलोडे : मानसशास्त्रावर राष्ट्रीय परिषद