लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : आष्टी मार्गावर २ किमी अंतरावर कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची ५२ एकर जमीन आहे. पैकी १५ एकर जमीन वाहितीत असून उर्वरित जमीन पडिक आहे. काही एकरात सोयाबीनचे पीक असून काही एकरात फळरोपवाटिका आहे; पण कृषी चिकित्सालयाचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे पीक तथा फळरोपवाटिकेची दुरवस्था असून लक्ष देत कार्यवाहीची मागणी होत आहे.सोयाबीन पेरलेल्या जमिनीला एका भागाला रस्ता लागून असून एका भागाला पांदण रस्ता आहे; पण दोन्ही भागातील काटेरी ताराचे कुंपण तुटलेले आहे. यामुळे पिकात दिवसभर मोकाट गुरे चरून पिके उद्ध्वस्त करीत आहे. पडित जमिनीत गुराखी आपली गुरे चारतात; पण या सर्व बाबीकडे कार्यरत कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तेथे चरत असलेल्या गुरांचा त्रास शेजारील शेतकºयांना सोसावा लागत आहे. शासन दरवर्षी या जमिनीवर लाखो रुपयांचा खर्च करते; पण इतका खर्च करूनही सदर विभागाच्या जमिनीची दुरवस्था झाली आहे. अधिकारी कागदोपत्री खर्च दाखवित असून प्रत्यक्षात कामे होत नसल्याची स्थिती आहे. गुरांच्या त्रासाबाबत शेजारील शेतकºयांनी तेथील अधिकाºयांकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या; त्या तक्रारींकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याचे शेतकरी सांगतात. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत संबंधित कर्मचाºयांना उपाययोजना करण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
कृषी चिकित्सालयाचा अनागोंदी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:07 AM
आष्टी मार्गावर २ किमी अंतरावर कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची ५२ एकर जमीन आहे. पैकी १५ एकर जमीन वाहितीत असून उर्वरित जमीन पडिक आहे.
ठळक मुद्देकर्मचाºयांचे दुर्लक्ष : काटेरी तारांचे कुंपण तुटल्याने पिकांत चरतात गुरे