लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे. कृषी व प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा शिक्षण विभागातही अधिकारी नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे यांची बदली होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला; पण कृषी अधिकारी दिला नाही. मंडळ अधिकारी, तांत्रिक कृषी अधिकारी, कृषी सहायक ही पदेही रिक्त आहे. सद्यस्थितीत कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेढकर धूरा हाकत आहे. त्यांच्यामागे बैठकांचा ससेमिरा असल्याने कामकाज सांभाळताना कसरत करावी लागते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्याकडे शेतकºयांनी अनेकदा तक्रारी केल्या; पण त्यावर आश्वासनेच मिळाली. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्या म्हणून आष्टी तालुक्याची नोंद आहे; पण याच तालुक्यात तालुका कृषी अधिकारी नाही. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सव्वा दोन वर्षांपासून अधिकारी नाही. पर्यवेक्षक प्रभा पाटील या प्रभार सांभाळत आहे. प्रभार असतानाही त्यांनी सर्व कामे चोख पार पाडली. शासनाच्या योजना राबविल्या. सकाळी ९.३० वाजता नियमीत कार्यालयात येणाºया पहिल्या अधिकारी म्हणून पाटील परिचित आहे. पर्यवेक्षकाचे काम सांभाळून त्यांना अधिकाºयाची कामे करावी लागतात. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देत नियमित अधिकारी देण्याची मागणी केली आहे; पण अद्याप अधिकारी मिळाले नाही. गटशिक्षणाधिकारी व्ही.ए. दुबे यांची बदली झाल्याने जागा रिक्त झाली. सध्या विस्तार अधिकारी देशपांडे प्रभारी आहे. नियमित अधिकारी नसल्याने शिक्षण विभागाचा डोलारा कोलमडला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
तालुका कृषी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या पदांसाठी निवेदन दिले आहे. लवकरच अधिकारी मिळणार, असे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.