शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नगरपालिका झालीय बेघरांच्या आयुष्यांची ‘सारथी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:58 PM

कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.

ठळक मुद्देबेघरांच्या डोक्यावर छत आणि पोटाला मिळतोय आधार : पालिकेच्या दायित्वाला सामाजिक संघटनेची मिळाली साथ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.वर्धा नगर पालिकेत शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा ठणठणाट असतानाही पालिकेने स्वत:च्या निधीतून शहरातील विकासकामांना चालना दिली आहे. विकास कामांंसोबतच वर्षानुवर्षे संसारापासून दूर लोटल्या गेल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन जगणाºयांसाठी राहण्याची, जेवणाची आणि आरोग्यबाबतही सुविधा उपलब्ध करुन देत नवा आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर पालिकेने स्वनिधीतून ‘बेघरांचा निवारा’ उभारण्यात आला आहे. येथे चार मोठ्या खोल्या आहे. महिला व पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह व स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील बेघर असलेले महिला व पुरुषांना या निवाऱ्यात आणण्याची व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेच्यावतीने सारथी बहूउद्देशिय सामाजिक संस्थेकडे सोपविली आहे. या संस्थांचे सदस्य बेघरांना आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस निवाºयातील संख्या वाढत आहे. जर शहरातील बेघर असलेले सर्वच जण या निवाºयात दाखल झाले तर कुणीही रस्त्याच्या कडेला उपाशापोटी खितपत पडून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती सर्वांच्याच सहकार्याची, हे विशेष.वृद्धांसह दिव्यांगांची विशेष काळजीशहरातील बेघर असलेल्यांना सारथी बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांमार्फत या निवाऱ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या निवाºयात राहणाऱ्यांना दररोज दोन वेळेचे जेवन, नास्ता व चहा दिला जातो. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन औषधोपचारही केल्या जातो. दिव्यांग आणि वृद्धांची विशेष काळजी घेतली जाते. जे काम करु शकतात त्यांना अर्ध्याकिंमतीत सेवा पुरविली जाते. तर जे कामच करु शकत नाही अशांना सर्व सेवा मोफत दिल्या जात आहेत.पंडीत दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेंतर्गत बेघरांना निवारा हा उपक्रम सुुरु करण्यात आला आहे. याची देखभाल करण्याची जबाबदारी सारथी बहूउद्देशीय सामाजिक संंस्थेला देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून पालिकेने रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष,वर्धा.जोपर्यंत शहरातील सर्व बेघर असलेले व्यक्ती निवाऱ्यात पोहचणार नाही, तो पर्यंत शोध मोहीम सुरुच राहील. ज्यांनाही बेघर व्यक्ती आढळून आला. त्यांंनी त्या व्यक्तील या निवाऱ्यापर्यंत पोहचवावे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य केले तर कुणीही उघड्यावर उपाश्यापोटी झोपणार नाही.- मंगेश चांदुरकर, प्रशासकीय अधिकारी, सारथी संस्था, वर्धा.४७ बेघरांना मिळाला निवारावर्धा नगर पालिका व सारथी संस्थेव्दारा गुरुवारी शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, साई मंदिर,शास्त्री चौक, गोंड प्लॉट व ईतर भागातील बेघर लोकांना शोधून बेघरांच्या निवाऱ्यात पोहचविले. तेथे त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली. सध्या या निवाºयात ४७ बेघरांना आधार मिळाला आहे. रात्री सुरु झालेली ही शोध मोहीम पहाटे २ वाजतापर्यंत सुरु राहिली. यासाठी नगर पालिकेचे पथक प्रमुख किशोर साखरकर, अक्षय बनगिरवार, विशाल सोमवंशी, सुजीत भोसले, गजनन पेटकर, निखील लोहवे, चित्रा चाफले, लिखिता ठाकरे, माधुरी चावरे, धर्मदास डोंगरे, सारथी संंस्थेचे चंद्रशेखर रुईकर, खुशाल नेहारे, नयन मगर, मिथुन मोतेवार, हिरामण रुईकर, चिन्मय देशपांडे, साजीत मालाधारी, मोरेश्वर गळहाट तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक बोरखेडे, इमरान खिल्ची व महेंद्र अढाऊ यांचे सहकार्य मिळाले.