लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-सेलू विधानसभा मतदार संघातील स्थगीत केलेल्या कामांना पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसह इतर दहा समस्या तत्काळ सोडविण्याकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. या पत्रात त्यांनी मतदारसंघातील मुख्य समस्यांना प्राधान्य दिले आहे.त्यामध्ये महिला बचत गट भवानाच्या कामावरील स्थगिती तत्काळ उठवून कामे सुरु करण्यात यावी. शहरालगतच्या पिपरी (मेघे) सह १३ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु ग्रामीण भाग असतानाही नागरिकांना शहरी भागाप्रमाणे देयक आकारले जात आहे. त्यासंदर्भात निर्णय घेऊन दर ५.२५ करण्यात यावे.सालोड (हिरापूर) हे दत्तक ग्राम असल्याने येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात यावी. सेलू परिसरातील बहूतांश जमीन बोर अभयारण्यालगत असल्याने वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नवरगावच्या धर्तीवर गरमसूर या गावाचेही पुनर्वसन करावे.वर्धा शहरातील रामनगर परिसरात पालिकेच्या जागेवर लिजने राहणाºया नागरिकांना मालकी हक्काने भूखंड देण्याबाबत कार्यवाही करावी. पोलीस गृह योजनेकरिता तसेच वर्धा शहरातील मुख्य पोलीस ठाण्याच्या नुतनीकरणासाठी ४९ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याने ते काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश द्यावे. बोर प्रकल्प व त्याचे लाभक्षेत्र, मदन तलाव व लाभक्षेत्र तसेच धाम प्रकल्पाच्या कालवे व वितरिकेच्या देखभाल दुरुस्तीकरिता पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा.धाम प्रकल्पातून वर्धा शहरासह लगतची १४ गावे, एमआयडीसीला पाणीपुरवठा केल्या जातो. त्यामुळे या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडलेला आहे त्याला मंजूरी द्यावी, यासोबतच दिव्यांग व्यक्तींना कुटुंब प्रमुखाची अट न ठेवता ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही पालिकेक डून मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्यात यावी व सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्या अंतर्गत सुरु असलेली कामे तातडीने पुर्ण करावी, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा-सेलू विधानसभा मतदार संघातील स्थगीत केलेल्या कामांना पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसह इतर दहा समस्या ...
ठळक मुद्देपंकज भोयर। पत्रातून मांडल्या विविध दहा समस्या