लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू आदी किटकजन्य आजार डोके वर काढतात. डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य उपाययोजना करीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ . श्वेता थूल यांनी केले.राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देवळी तालुक्यातील गौळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने कोल्हापूर (राव) येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप उटाणे होते. डॉ. थूल पुढे म्हणाल्या, एक प्रकारे हा आजार मानवनिर्मितच आहे. कारण हा डास वापराच्या शुद्ध पाण्यात तयार होतो. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे. त्यामुळे डास उत्पत्तीला आळा बसून किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविता येत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सुमेध वासेकर यांनी मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ६४ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कुसूम नाल्हे यांनी केले तर आभार शिला बेताल यांनी मानले.
डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:51 PM
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू आदी किटकजन्य आजार डोके वर काढतात. डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य उपाययोजना करीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ . श्वेता थूल यांनी केले.
ठळक मुद्देश्वेता थूल : कोल्हापूर (राव) येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा