ग्राहकांची फसवणूक : जिल्हा प्रशासनाला निवेदनातून साकडेवर्धा : मैत्रेय प्लॉटस् अॅण्ड इन्ट्रचर्स प्रा.लि. या कंपनीने गुंतवणूक व प्लॉट स्किमच्या नावावर नागरिकांची फसवणूक केली. शहरातील अनेक नागरिकांची यात फसगत झाली असून संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले.मैत्रेय या कंपनीकडून नागरिकांना भुरळ घालण्याकरिता विविध योजनांचे आमिष दाखविले गेले. यात प्लॉट विक्रीच्या नावावर इन्स्टॉलमेंटवर रकमा घेतल्या. गुंतवणूक-दारांची रक्कम दुप्पट करून देण्याची ग्वाही दिली. १२ टक्के व्याज देण्याचेही सांगितले. यामुळे राज्यात तसेच जिल्ह्यात अनेक नागरिकांनी पैसे गुंतविले; पण सदर कंपनीने रकमेचा गैरवापर करीत ग्राहकांची फसवणूक केली. या प्रकरणी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी निदर्शने करीत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
मैत्रेयविरूद्ध नागरिकांची निदर्शने
By admin | Published: July 26, 2016 1:52 AM