शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

हुकूमशाहीकडे जाणारा देश वाचविण्याची जबाबदारी नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:18 AM

देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला.

ठळक मुद्देकुमार केतकर : ‘गांधी समजून घेताना’वर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला. २०१९ नंतर जर पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत, तर या देशात नथ्थुराम गोडसेंना राष्ट्रपिता म्हणून गौरविल्या जाईल, अशी भीती ज्येष्ठ संपादक व राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली.गांधी फॉर फ्युचर व सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर गांधी विचार व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या. यावेळी चरखा, खादीची शाल व सूतमाळ देवून खा. केतकर त्यांचा स्वागताध्यक्षांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित फाळके पाटील यांनी केले. यात त्यांनी आपण कारंजासारख्या लहानश्या गावातून शिक्षण घेवून देश-विदेशात विविध ठिकाणी फिरलो. अनेक लोकांशी संवाद साधला. परंतु, कुठेतरी नंतर आपल्याला गावाकडे परतण्याची इच्छा निर्माण झाली. यामागे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रेरणा व विचार कारणीभूत होते, असे त्यांनी सांगितले.व्याख्यानात खा. कुमार केतकर म्हणाले, गांधी समजून घेण्याची गरज जगापेक्षा भारताला अधिक निर्माण झाली आहे. कारण गांधी समजून घेवून जगातील विविध देश विकासाकडे पुढे जात आहे. आपल्या देशात आजही नथ्थुराम गोडसेंच्या विचारांचे गुणगाण गाणारे लोक कायम आहे. महात्मा गांधी यांचा मृत्यू होवून ७० वर्षे झालीत. परंतु, अजूनही या महात्म्याची भीती सत्ताधारी पक्षासह गांधी विरोधकांमध्ये कायम आहे. त्यामुळे ते नेहमी सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करून गांधींची आठवण करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इंग्रजांनाही प्रचंड भीती होती. नि:शस्त्र असलेला हा माणूस इंग्रजांना तेव्हाही भारी पडला होता. जगातील ५६ ठिकाणी इंग्रजांची राजवट होती. मात्र, तेथे होणारे लढे हे शस्त्राने व्हायचे, ते परतुन लावण्याची ताकत त्यांच्यामध्ये होती; पण भारतातील गांधींच्या नेतृत्वातील लढे हे नि:शस्त्र असल्याने इंग्रज गोंधळून जायचे, असे त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू यांच्याशी गांधीजींचे अनेक मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय गांधींनीच घेतला होता, असा दावाही केतकरांनी केला. आगामी काळात भारतात निवडणुकांमध्ये कोणता पक्ष, कोणते सरकार येईल हे सांगणे कठीण असले तरी या देशात हुकुमशाही राजवट निर्माण होवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून मतदान करण्याची गरज आहे, असे खा. केतकर यावेळी म्हणाले. महात्मा गांधी हयात असताना त्यांची टिंगल-टवाळी तेव्हाही झाली होती. आज सोशल मिडियावर ती केली जात आहे. ही नवी गोष्टी नाही, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार मुरलीधर बेलखोडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुमन बंग, डॉ. उल्हास जाजू, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, ज्ञानेश वाकुडकर, प्रशांत देशमुख, भूमीपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रवीण काटकर, रितेश घोगरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, मनोज चांदुरकर, प्रा. किशोर वानखेडे, डॉ. सचिन पावडे, रवी बालपांडे, नितीन झाडे, गंगाधर मुटे, तुषार पेंढारकर, पंकज वंजारे, अमोल देशमुख, मोहित सहारे, यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्तीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.