लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काम पूर्ण झालेल्या योजनेतून त्वरित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करीत वानोडाच्या नागरिकांनी थेट जि.प. सभागृहात धडक दिली. ‘आम्हाला पाणी द्या’, अशी मागणी करीत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.वानोडा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. मागील एक ते दीड वर्षापासून योजनेचे बरेच काम पूर्णत्वास गेले असल्याने ही योजना कार्यान्वित करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या योजनेतील जलकुंभाचे बांधकाक करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली आहे; पण अद्यापही ही योजना कार्यान्वित झाली नाही. गावाच्या पाण्याचा प्रश्न असल्याने त्वरित या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करीत बुधवारी वानोडा येथील महिला-पुरूषांनी थेट जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले. स्थायी समितीची बैठक संपताच जि.प. अध्यक्षांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली.नागरिकांची समस्या लक्षात घेत जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी वानोडा येथील पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. येळाकेळीचे सरपंच वैरागडे यांच्या नेतृत्वात धडकलेल्या वानोडा येथील नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषदेचा परिसर चांगलाच दणाणला होता.पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनयेळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या वानोडा येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. योजनेचे बरेच काम पूर्ण झाल्याने लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; पण यात राजकारण सुरू झाले आहे. ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन काम निकृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली. यावरून चौकशीचा ससेमिरा लागला. हा प्रकार दूर करून त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.वानोडा येथील नागरिकांनी याबाबत मंगळवारी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांना निवेदन दिले. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तथा संबंधित विभागाला कळविण्याचे सांगितले. वानोडा येथील पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली. महत्त्वाची दोन्ही कामे एक-दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाली. अद्याप ही योजना कार्यान्वित झाली नाही. या योजनेचे झालेले काम चांगल्या दर्जाचे असून काही काम अद्याप शिल्लक आहे. असे असले तरी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पाणी पुरवठा सुरू करावा, अशी रास्त मागणी आहे. निवेदनावर सतीश शेंडे, तेजराम लिबडे, प्रफुल कोरडे, गोपाल लिचडे, कैलास मडावी, पुंडलिक वैरागडे, कान्होजी सुरकार, रामकृष्ण बावणे, रामू धुर्वे, शंकर सुरजुसे, मनोहर सुरतकर, अशोक शेंडे, अजय कंडे, अमोल नरताम, दिलीप कडू, अरविंद शेंडे, चिंधू शेंडे, सुभाष भिसे आदींच्या सह्या आहेत.
पाण्यासाठी वानोडाचे नागरिक जि.प. सभागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 10:11 PM
सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ठळक मुद्देराजकारण होत असल्याने संताप : पाण्यासाठी होतेय भटकंती