लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणाने संपूर्ण शहराची वाट लागली आहे. प्रमुख रस्त्यांसह गल्लोबोळीत अतिक्रमणामुळे आर्वीकरांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र आहे. शहरातील नेहरू मार्केट परिसरात वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही. नगरपालिका प्रशासन, महसूल विभागासह बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अनेक व्यावसायिक आमची विक्री होत नाही किंवा आमचे व्यवहार ठप्प पडल्याचे सांगून त्यांनी चौफेर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कुणीही येथे जाण्यास धजावत नाहीत. न.प. प्रशासनाने त्यांच्याजवळ असलेल्या रेकॉर्ड नुसार दुकानांची मोजणी करून तेवढीच जागा त्यांच्या ताब्यात ठेवून उर्वरित रस्ता रहदारीसाठी व ग्राहकांसाठी मोकळा ठेवावा, जेणेकरून त्यांची विक्री होईल आणि नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. शहरातील वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि रस्त्याची बकाल स्थिती असताना चौकाचौकात वाढलेले अतिक्रमण आणि वाहतुक नियमाचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, पार्किंगची योग्य व्यवस्था आदी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. पार्किंगची सोय नसल्याने योग्य जागा दिसेल तेथे वाहने उभी ठेवल्या जात आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अनेक ठिकाणं अपघात स्थळ बनले आहे. बसस्थानकासमोरील एलआयसी कार्यालयासमोर काळीपिवळी दोन्ही बाजूला उभ्या असतात त्यामुळे वसंतनगर येथून येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर वाहने उभी राहत असल्याने कोंडी निर्माण झाली आहे.शहराच्या रस्तावरील अतिक्रमणाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहे.यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चाही झालेली आहे. सध्या स्थिती लक्षात घेता पहिले लढाई कोरोना सोबत असल्याने संपूर्ण प्रशासन दिलेल्या निर्देशानुसारच काम करीत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते नियंत्रणात येताच रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल.-प्रा.प्रशांत सवालाखे,नगराध्यक्ष, नगरपालिका आर्वीआर्वी शहरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेता वाहतुकीसाठी वाढलेले अतिक्रमण अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याकरिता संयुक्तरीत्या मोहीम राबविल्यास नगरपालिका विभाग, नझूल, तहसील कार्यालय व बांधकाम विभागार्फे काढल्यास आम्ही अतिक्रमण काढण्याकरिता सहकार्य करू.-शिवाजी जाठे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.आर्वी शहरातील वेगवेगळ्या मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे लोकांना ये जा करताना होत असलेल्या त्रासाबाबत मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्याकरिता संबंधितांनी सर्व विभागाचे सहकार्य लागेल. यादृष्टिकोनातून लवकरच चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल व शहरातील गर्दीच्या भागातील अतिक्रमण काढण्यात येईल,-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, तहसील कार्यालय आर्वी,
वाढत्या अतिक्रमणाने गुदमरतोय आर्वी शहराचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM
शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही.
ठळक मुद्देमार्केट परिसरात व्यावसायिकांची मनमर्जी : न.प. प्रशासनासह पोलीस विभागाने कारवाई करण्याची मागणी