लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दक्षिण ऑफ्रिकेला जाताना पहिल्यांदा ज्या रेल्वे डब्यातून प्रवास केला होता, त्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वेस्थानकावर तर वर्धेकरांच्या मतदानातून निवडलेला शहरपक्षी नीलपंख, याची भव्य प्रतिकृती जिल्ह्याच्या प्रेवश व्दारावर उभारली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुनील केंदार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.सेवाग्राम येथील चरखा घरच्या आवारात स्क्रॅपपासून बनविलेले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे भव्य शिल्प बसविण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचे सौदर्यीकरण करण्यात आले आहे. सौदर्यीकरण झालेल्या कामाचे स्वरूप तसेच कायम राहावे म्हणून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि मोठे शासकीय कार्यालये यांना सोपविण्यात यावी, अशी सूचनाही पालकमंत्री यांनी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री उपस्थित होते.शासकीय कार्यालयात चरखा लागणारसेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती इतर जिल्ह्यातून तसेच परदेशातून येणाºया नागरिकांना व्हावी, यासाठी नागपूर विमानतळ, नागपूर रेल्वेस्थानक, वर्धा रेल्वेस्थानक आणि वर्धा बसस्थानकावर ऐतिहासिक माहिती देणारे केंद्र उभारण्यात यावे.जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या शासकीय कार्यालयात चरख्याची प्रतिकृती बसविण्यात यावी. तसेच पवनार येथील धामनदीच्या पात्राची शोभा वाढविण्याकरीता पाण्याचे मोठे कारजेही उभारण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री सुनील केदार यांनी या आढावा बैठकीत दिल्यात. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ही विकास कामे गांधी जयंतीपूर्वी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता या कामांना गती येणार आहे.
जिल्हा सीमेवर शहरपक्षी नीलपंख करणार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM
राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : रेल्वेस्थानकावर बसविणार बापूंच्या आफ्रिका प्रवास रेल्वे डब्याची प्रतिकृती