लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सध्या विविध कामानिमित्त बाहेरगावी जाणारे नागरीक आपली वाहने उभी करीत आहेत. याचा ठाण्यात कार्यरत कर्मचाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दररोज येथे शेकडो वाहने मनमर्जीने उभी केली जात असून त्याकडे ठाणेदारांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आदी जिल्ह्यात दररोज विविध कामानिमित्त जाणारे सध्या वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आपले वाहन उभी करतात. अनेक वाहनचालक आपली वाहने मनमर्जीने उभी करीत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास वर्धा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांकडून दुचाकी वाहने उभी केली जात आहेत त्याच परिसरात पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेली वाहनेही उभी करण्यात आली आहे. बहुदा काही खुरापती वृत्तीचे व्यक्ती जप्तीत असलेल्या वाहनांचे नुकसान करतात. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या अडचणीत वाढ होत आहे. नागरिकांकडून शहर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केली जाणाºया वाहनांच्या बॅटºया चोरट्यांनी लंपास केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, अनेक प्रकरणांची नोंद शहर पोलीस कचेरीत नाही. सदर प्रकार गत काही महिन्यांपासून सूरू असून त्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाºयांची डोकेदुखी वाढली आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकार ये-जा करणाºयांनाही दिसतो;पण याकडे ठाणेदारांचे दुर्लक्ष होत आहे. अधिकारीच पोलीस ठाण्याच्या विविध कामाकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याची दबक्या आवाजात कर्मचाºयांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.बदली होऊनही सोडण्यास टाळाटाळगत काही महिन्यांपूवी बदलीचा आदेश झालेल्या एका कर्मचाºयांला अद्यापही शहर ठाण्यातून सोडण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर ठाणेदारांच्या आदेशावरून सदर व्यक्तीकडे मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांमध्ये सध्या उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे.शाळेला बुट्टी मारणाºयांची असते चहलपहलशहर ठाण्याच्या आवारातील मंदिरात दररोज शाळेला बुट्टी मारणाºया मुला-मुलींची चहलपहल असते. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी याच परिसरात शाळेचा वेळ शाळेत न जाता घालवतात. यात सर्वाधिक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश राहत असून त्यांना तंबी देण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.व्यावसायिकाला फटकास्थानिक बजाज चौक भागात नगर पालिकेच्यावतीने कंत्राटी पद्धतीने वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. परंतु, अनेक वाहने कुठलीही रोखटाक न होता शहर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केली जात असल्याने बजाज चौक येथील वाहनतळाचा कंत्राट घेणाºया छोट्या व्यावसायिकाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शहर पोलीस ठाणे झाले वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:13 AM
स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सध्या विविध कामानिमित्त बाहेरगावी जाणारे नागरीक आपली वाहने उभी करीत आहेत.
ठळक मुद्देठाणेदारांचे दुर्लक्ष : तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी