लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही कडकडीत बंद आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने याला पायबंद घालण्याकरिता नगरपालिकेने शहराचे शंभरटक्के निजंर्तुकीकरण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहे. दोन दिवसांपासून मशीनच्या सहाय्याने फवारणी सुरु केली आहे.जिल्ह्यासह शहरातही अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसतानाही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नगपालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. शहरात दुपारपर्यंत नागरिकांची काहीशी वर्दळ पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसगार्पासून शहराच्या बचावाकरिता नगरपालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून वाडार्वार्डात नियमित फवारणी केली जात आहे. यासोबतच धुरळणीही सुरुअसल्याने निजंर्तुकीकरण होत आहे. आता मोठ्या रस्त्यांचे निजंर्तुकीकरण करण्याच्या उद्देशाने जळगावातून चार मशीन मागविण्यात आल्या. मात्र, दोनच मशीन प्राप्त झाल्याने या दोनच मशीनच्या सहाय्याने बुधवारपासून निजंर्तुकीकरणाला सुरुवात करण्यात आली. पण, बुधवारी ढगाळी वातावरण असल्याने फवारणी थांबविण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून पुन्हा मशीनच्या सहाय्याने शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेत फवारणी करण्यात आली. नियमित दहा कर्मचाऱ्यांकडून वॉर्डनिहाय फवारणी व धुरळणी केली जात आहे. नियमित फवारणी व धुरळणीच्या सहाय्याने शहराचे निजंर्तुकीकरण केले जाणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. पालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी स्वत: उपस्थित राहून लक्ष देत आहेत.स्वावलंबी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भाजी बाजारात सोशल डिस्टंसिंगसंचारबंदी लागू असतांनाही शहरातील मुख्य भाजीबाजारासह गोलबाजार, आर्वीनाका, केसरीमल कन्या शाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीकरिता नागरिकांची गर्दी पहावयास मिळत होती. त्यामुळे गर्दी टाळून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने येथील सर्व भाजीबाजार उठवून स्वावलंबी मैदान व डॉ. आंबेडकर चौकात व्यवस्था करण्यात आली होती. आज वर्धेकरांनी या दोनच ठिकाणी ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून भाजीपाला खरेदी केला.शहराच्या बजाज चौकामध्ये मुख्य भाजीबाजार आहे. येथे संचारबंदीच्या काळातही येथे भाजीपाला उत्पादक व खरेदीदारांची मोठी गर्दी होत होती. यासोबतच गोलबाजार, आर्वीनाका, केसरीमल कन्या शाळेसमोरील परिसरात नागरिक गर्दी करीत होते. ही गर्दी कोरोनाच्या संसर्गाकरिता पोषक असल्याने गर्दी टाळण्याकरिता हे सर्व बाजार बंद करुन स्वावलंबी शाळेच्या मैदानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीबाजार व फळांच्या दुकानाची व्यवस्था करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी घेतला. त्यानुसार आज गुरुवारपासून या दोन्ही ठिकाणी भाजी व फळविक्रिला सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व क्रीडा संकुल मार्गावर एका बाजुने शंभर दुकाने तर दुसºया बाजुने पार्कीगची व्यवस्था करण्यात आली होती. तर साईनगर परिसरातील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर १०० दुकानांची व्यवस्था करुन पार्कीगही करण्यात आली होती. भाजी व फळे विकत घेतांना ग्राहकांमध्ये अंतर राहावे याकरिता चुन्याने चौरस आखले होते. त्यामुळे ग्राहकांनी चौरसाचा नियम पाळूनच भाजीपाला व फळांची खरेदी केली. सकाळी ७ वाजतापासून दुपारी २ वाजतापर्यंत या दोन्ही ठिकाणी भाजीपाला व फळांची विक्री सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही याला सहकार्य करण्याचे आवाहन, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
शहराचे होतेय निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM
जिल्ह्यासह शहरातही अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसतानाही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नगपालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. शहरात दुपारपर्यंत नागरिकांची काहीशी वर्दळ पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देवर्धा नगरपालिकेचा पुढाकार : अधिकारी व पदाधिकारी उतरले रस्त्यावर