लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.तापनामाने ४५ अंशांचा आकडा पार केला असताना वातावरणातील बदलाने आजारी पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शासकीय तसेच खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. यातच गढूळ पाणीपुरवठा करून नगर परिषद प्रशासनाने यात आणखी भर घातल्याचेच दिसून येत आहे. शहराला येळाकेळी व पवनार येथील पंप हाऊसवरून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जवळपास ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. यामुळे ती जीर्ण झाली आहे. कित्येक वर्षांपासून मुख्य पाईपलाईन बदलण्यात आली नाही. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंपावरव कोणतेही सुरक्षिततेचे उपाय केलेले दिसून येत नाही.पंपावरील साफसफाईचे तिनतेरा वाजले असून पाण्यात कधीही ब्लिचींग पावडर वा तुरटी टाकण्यात येत नाही. यामुळे अनेक दिवसांपासून शहरातील काही भागात गढूळ व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते. याबाबत अनेकांकडून तक्रारीही केल्या जातात. आता पुन्हा फुटलेल्या पाईपलाईनमुळे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाईपलाईन दुरूस्त केली असली तरी शुद्ध पाणी पुरवठा होईल, याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.मागील वर्षीही आरती चौकात फुटली होती पाईपलाईनशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवनार आणि येळाकेळी येथील पाईपलाईन ही ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. ही पाईपलाईन बदलण्याबाबत कधीही विचार झाला नाही. मागील वर्षी आरती चौकात ही पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला होता. दरवर्षी नेमकी उन्हाळ्यातच पाईपलाईन फुटत असताना नगर परिषद कोणताही बोध घेत नसल्याचेच दिसून येते.बांधकामांवर बंदी लावणे अगत्याचेमुख्य जलवाहिनी फुटल्याने मागील दहा दिवसांपासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात असणाºया कुपनलिकांपैकी जवळपास ७० टक्के कुपनलिकांना पाणी नाही. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शहरात बांधकामे धडाक्याने सुरू असल्याचे दिसते. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचेच दिसते. उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने बांधकामांवर बंदी लादावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्थेचा अभावदहा दिवसांपूर्वी पवनार येथील पंपहाऊसमधून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यानंतर शहरात पाच दिवस पाणी पुरवठा होणार नाही, असे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले होते. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यास पाच दिवसांचा कालावधी लागेल, हे माहिती असताना नगर परिषद प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
गढूळ पाण्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:51 PM
शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.
ठळक मुद्देफुटलेल्या जलवाहिनीचा फटका : शुद्धतेकडे लक्ष देणे गरजेचे