शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा

By admin | Published: January 01, 2017 2:04 AM

महाविद्यालयीन युवकांना पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाकडे आकर्षित करून स्वच्छता अभियानात त्याचा सक्रीय सहभाग

विद्यार्थ्यांना संधी : स्वच्छ भारत मिशनचा उपक्रम वर्धा : महाविद्यालयीन युवकांना पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाकडे आकर्षित करून स्वच्छता अभियानात त्याचा सक्रीय सहभाग घेण्यासाठी राज्यात दरवर्षी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन जि.प. अंतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय स्पर्धेतून जिल्हा स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड होईल. यात वक्तृत्व शैलीचे उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांची निवड राज्य स्पर्धेसाठी होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाणी पुरवठा, पाणी गुणवत्ता व स्वच्छता या बाबीची जागृती करणे तसेच पाणी व स्वच्छतेबाबत प्रत्येक महा.तून संदेश वाहक अभ्यासू वक्ते तयार करून जागृती करणे, हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांना स्वच्छतेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी उद्युक्त केले जाते. उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने विषयाची बहारदार मांडणी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला पुरस्कार दिले जातात. तालुकास्तर विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटातून प्रथम व द्वितीय विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र ठरतील. ही स्पर्धा ३ जानेवारीपूर्वी आठही तालुक्यात आयोजित केली जात आहे. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)