ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्तसेवाग्राम : स्वच्छतेचा मंत्र गांधीजींनी दिला. प्रत्यक्ष गावात कार्य केले; पण ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचे वावडे असल्याचेच दिसते. मुख्य मार्गावर असलेले उकिरडे, हे त्याचे उदाहरण सांगता येईल. उकिरडे व दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पाच प्रभाग, १५ जणांची कार्यकारिणी, नवीन ले-आऊट आणि अद्यावत घरे ही ग्रा.पं. ची करासाठी जमीची बाजू आहे. विविध कामांसाठी शासनाकडून येणारा निधी वेगळाच आहे. गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले. यामुळे देश-विदेशातील पर्यटक, दर्शणार्थी आणि अभ्यासक येतात. गांधीजी आणि आश्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांना मुख्य मार्गावर दर्शन ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचेच दर्शन होते. मुख्य मार्गावरील उगले ले-आऊट परिसरातील नागरिक रस्त्याच्या कडेला स्वत:च्या सुविधेनुसार कचरा टाकतात. सध्या सहा ठिकाणी कचरा जमा आहे. ग्रा.पं. च्या स्वच्छता विभागाला याची थोडीही खंत नाही. बांगडे, प्रफुल बहादुरे हेच त्याची कशीतरी विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. गावातील चित्रे यापेक्षा वेगळे नाही. स्वच्छता कराची आकारणी ग्रा.पं. करते मग अस्वच्छता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(वार्ताहर)
मुख्य मार्गावर उकिरडे, ग्रा.पं.ला स्वच्छतेचे वावडे
By admin | Published: September 12, 2016 12:50 AM