लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविल्या जाणार असून त्याचा श्रीगणेशा जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी स्वच्छतेची शपथ घेतली.स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्यापक जनजागृती अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती निता गजाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शेळके, कार्यकारी अभियंता गहलोत, कार्यकारी अभियंता तेलंग, कृषि विकास अधिकारी खडीकर, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पंकज सायंकार आदींची उपस्थिती होती.स्वच्छ भारत मिशनच्यावतीने केंद्र व राज्यस्तरावरुन विशेष जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाला देण्यात आल्या आहेत. शासनाचा हा उपक्रम केवळ शासकीय व कागदोपत्री न राहता त्यात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा व स्वच्छतेचा संदेश गावागावांसह घराघरात पोहोचावा या हेतूने १५ ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जि. प. सभागृहात झाला.मार्गदर्शन करताना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी कार्यालय स्वच्छ रहावे ही त्या-त्या कार्यालयातील प्रत्येक अधिकारी तथा कर्मचाºयांची नैतिक जबाबदारी आहे. कुठेही घाण व कचरा होऊ देता कामा नये. तसेच सर्वांनी स्वच्छतेच्या या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान जि.प. सभापती जयश्री गफाट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे यांनी केले तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन खाडे यांनी मानले.श्रमदान करुन केला कार्यालय परिसर स्वच्छ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाच्या शुभारंभानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी श्रमदान करून जिल्हा परिषद कार्यालय परिसर स्वच्छ केला. याप्रसंगी कार्यालय परिसरातील वाढलेले गवत कापून तसेच कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, सभापती जयश्री गफाट, सोनाली कलोडे, निता गजाम आदींनी स्वत: हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला.प्रभातफेरीतून विद्यार्थ्यांनी केले प्रबोधनसमुद्रपूर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आरंभा येथे स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा परिसरातून स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना गाव स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी काही ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेबाबत प्रबोधन केले. रॅलीदरम्यान स्वच्छता गीत सादर करून घोषणा देण्यात आल्या. या उपक्रमात सचिन खडसे, गजानन खोडे, चंद्रकांत कुकडे, महेंद्र ठमके, रामकृष्ण लढी, भास्कर मांडवकर आदी सहभागी झाले होते.पुलगावात बस स्थानकावर पथनाट्यातून जनजागृतीपुलगाव - स्थानिक कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. विलास हाडगे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. यावेळी प्रा. मनीषा अजमिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जीवनभर अथक प्रयत्न करणाºया संत गाडगेबाबांची वेशभुषाही यावेळी विद्यार्थ्यांनी साकारली होती. स्थानिक बसस्थानकावर सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात सेवा दिवसवर्धा - कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे आयोजित विशेष कार्यक्रम श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ व सुंदर भारत या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यात आला. यावेळी गोळा झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सदर उपक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. रूपेश झाडोडे, विशाल उबरांडे, डॉ. धनराज चौधरी, प्रा. उज्ज्वला क्षीरसाठ, प्रा. अंकिता अंगाईतकर, प्रा. कंचन तायडे, किशोर सोळंके, गजानन म्हसाळ, पायल उजाडे, प्रवीण भुजाडे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:41 AM
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविल्या जाणार असून त्याचा श्रीगणेशा जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाला.
ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम : जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांच्या उपस्थितीत घेतली शपथ