लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दीडशे कोटींच्या निधीतून होत असलेल्या वर्धा ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने अनियमिततेचा कळसच गाठला आहे. सुरुवातीला वेस्ट मटेरियल तर आता माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रस्त्याची कालमर्यादा निश्चितच कमी होण्याची शक्यता आहे.वर्धा-हिंगणघाट या मार्गाची दुरावस्था झाल्याने या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणासाठी शासनाकडून दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून वर्धा ते हिंगणघाटपर्यंत जवळपास ३५ किलो मीटरचे काम सुरु आहे. या कामाचा कंत्राट आरटीसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिला आहे.सध्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने खोदकाम करुन त्यात भर टाकण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर सेलू (काटे) ते वायगाव (नि.) दरम्यान असलेल्या निर्माणाधीन कालव्या नजिकच्या महामार्गावरील बाजू भरण्याकरिता काही भागात वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तपासणीचा देखावा करण्यात आला. वेस्ट मटेरियल काढण्याऐवजी तसेच दाबून टाकले. आता याच परिसरात माती मिश्रीत मुरुमही वापरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गाचे बांधकाम सदोष असून अधिकारी कंत्राटदाराच्या मर्जीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.चंदेरी प्रकाशात चालतेय कामवर्धा ते हिंगणघाट महामार्गाचे रात्रीच्या अंधारातच चालत असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर बाजू बुजविताना माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला. त्यानंतर लगेच रात्रीच्या अंधारात माती मिश्रीत मुरुम रस्त्यावर रोलरच्या सहाय्याने दाबला. तसेच त्यावर मुरुमाचा थर आंथरुन मातीमिश्रीत मुरुमाचे नामोनिशानच कंत्राटदाराने मिटवून टाकले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चंदेरी प्रकाशात या महामार्गाचे सदोष काम सुरु आहे.
अनियमिततेचा कळस; आता मातीमिश्रित मुरुमाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:41 PM
दीडशे कोटींच्या निधीतून होत असलेल्या वर्धा ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने अनियमिततेचा कळसच गाठला आहे. सुरुवातीला वेस्ट मटेरियल तर आता माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रस्त्याची कालमर्यादा निश्चितच कमी होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देआधी वेस्ट मटेरियलचा सोपस्कार : वर्धा ते हिंगणघाट महामार्गावरील प्रकार