लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आदींच्या नावाखाली औद्योगिक विकास झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे. या सर्व बाबींकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नागपूर पासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यात १५ वर्षांपूर्वी ५ एक्सप्लोझिव्ह कारखान्यांमध्ये १० हजार कामगार कार्यरत होते. याशिवाय, जिल्ह्यात २ सहकारी सूतगिरण्या व एका साखर कारखान्यात ५ हजार कामगार काम करीत होते. मात्र, या सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे या कामगारांचाही रोजगार हिरावला गेला आहे.या उद्योगाच्या शेकडो एकरी जमीणी ओस पडल्या आहेत. काही जमिनींची विक्री करण्यात आली. मात्र, या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेण्यात आले नाही. सूतगिरण्या व साखर कारखाने हे राजकीय पुढाऱ्यांचे होते. यात सरकारचे भागभांडवल होते. हे उद्योग केवळ राजकीय लोकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद झालेत. आज जिल्ह्यातील बेरोजगारांना दुसरी कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे काही भूमिपुत्र पुन्हा शेती व्यवसायाकडे वळले आहेत. तर काही हे उद्योग सुरू होईल, अशी आशा बाळगून आहेत. यातील अनेक कामगारांचे पैसही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पडून आहेत. बँक बंद झाल्याने कामगार दुहेरी संकटात सापडले आहेत.वर्धा जिल्ह्यातील बंद उद्योगांची दारे उघडावी. दोनशे अमेरिकन कंपन्या चीन मधून भारतात येण्यास उत्सुक आहेत. वर्धा जिल्ह्यात बंद पडलेल्या उद्योगात त्यांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून, विदर्भातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.- सुधीर दंदे, सामाजिक कार्यकर्ते वर्धा
६ वर्षांत वर्धा जिल्ह्यातील सूतगिरण्या, साखर कारखाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:16 PM
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे.
ठळक मुद्दे१६ हजार कामगारांना फटकासरकारचे दुर्लक्ष