आॅनलाईन लोकमतपुलगाव (वर्धा) : येथील रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला आग लागण्याची गत काही महिन्यातील दहावी घटना सोमवारी उघडकीस आली. उमरेडकडून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीच्या वॅगनला लागलेली आग कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने विझविली.मालगाडीच्या कोळशा वॅगनला आग लागल्याची माहिती मिळताच केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ४० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले, अशी माहिती जी.आर.पी.एफ.चे पोलीस हवालदार किशोर दाभाडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी येथे कोळशाला आग लागण्याची घटना घडली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. उमरेड कडून भुसावळकडे कोळसा घेऊन जाणारी मालगाडी मध्यरात्री पुलगाव स्थानकावर थांबली असताना बोगीतुन धूर निघत होता. ही घटना सकाळी उघडकीस आली. आग विझविण्यात अग्नीशामक दलाचे पी. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनात आर.के. कामडी, फायरमॅन पवन दाणी, उत्तम सिंग, प्रवीण हुड्डा, विकास सिंग यांनी सहकार्य केले. येथे आगीच्या घटना घडत असताना रेल्वे प्रशासनाने अग्नीशामक दलाची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला पुन्हा आग
By admin | Published: May 29, 2017 3:51 PM