शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा

By admin | Published: March 10, 2017 1:00 AM

स्थानिक राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे दुर्मिळ प्रकारात मोडणाऱ्या पोट विकाराबाबत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया

आर्वी : स्थानिक राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे दुर्मिळ प्रकारात मोडणाऱ्या पोट विकाराबाबत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. कालिंदी राणे व त्यांचे चमूने पार पाडली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गरीब कुटुंबातील ३८ वर्षीय महिलेवर करण्यात आली. सदर महिलेच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला.सदर महिलेच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्याने ती राणे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली. डॉ. कालिंदी यांना तिच्या पोटात गोळा असल्याची शंका आली. त्यांनी त्वरित सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बिजराज सींग (सोनोलॉजिस्ट) यांनी सोनोग्राफी केली असता तिच्या पोटातील गोळा आतल्या आत फिरल्याने त्याला आडी पडल्याचे निदान केले. महिलेला त्वरित शस्त्रक्रियेची गरज होती; पण तिची परिस्थती हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च तिला परवडणारा नव्हता. असे असले तरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेत सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून डॉ. कालिंदी व डॉ. रिपल राणे यांनी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची चिंता न करता किरकोळ खर्चात या महिलेवर शस्त्रक्रिया केली. तिच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून तिचे प्राण वाचविले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कालिंदी राणे यांना राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये कार्यरत संपूर्ण चमूने सहकार्य केले. यात डॉ. अमित मालपे, डॉ. प्रणित घोनमोडे (भूलतज्ञ), मदतनीस अजय निंबाळकर, आशिष अवचार व शस्त्रक्रिया विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हॉस्पीटलमध्ये यापूर्वी आठ ते दहा वेळा अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान देण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. रिपल राणे यांनी दिली. गरीब रुग्णांना नेहमीच सेवा दिली जात असल्याने रुग्णांची सोय होते, अशा प्रतिक्रीया उमटत आहे.(शहर प्रतिनिधी)