लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल करण्यासाठी येथे दररोज स्पर्धाच लागते. बहूदा अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने येथे शाब्दिक चकमकही उडते. विशेष म्हणजे येथे सकाळी सकाळीच पाण्यासाठी वाद होत असल्याचे बघावयास मिळत असून तालुका प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.स्थानिक ग्रामपंचायतचे सदैव दुर्लक्ष राहिलेला भाग म्हणजे आदर्शनगर. येथील नागरिकांना प्रत्येक उन्हाळ्यात भीषण जलटंचाईलाच सामोरे जावे लागते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्याचे ग्रा.पं.तील काही लोकप्रतिनिधी सांगत असले तरी वास्तविक परिस्थिती काय याची प्रचिती सकाळी या भागाचा फेरफटका मारल्यावर येतो. घागर-घागर पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असतना दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. या भागातील अनेक विहिरींसह बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. ज्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीतून मोटारच्या सहाय्याने सकाळीच पाण्याचा उपसा केल्या जातो. त्यामुळे जो उशीराने पोहोचला त्याला थेंबभरली पाणी मिळत नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मोटार पंप काढले विहिरीबाहेररविवारी सकाळी १० च्या सुमारास विहिरीजवळ शंभराच्या जवळपास नागरिक एकत्र आले. विशेष म्हणजे हे सर्व पाण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे येथे काही काळाकरिता तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाण्यासाठी सुरू असलेला वाद पोलिसांनी मध्यस्तीकरून सोडविला. त्यानंतर विहिरीतील मोटारपंप काढण्यात आले. शिवाय प्रत्येकाने खिराडीचा वापर करून विहिरीतील पाणी घ्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.ग्रा.पं. प्रशासनाने नेहमीच आदर्शनगराकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ग्रा.पं. प्रशासन केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आहे.- रोशन तेलंग, रहिवासी.विहिरीवरील मोटरपंपची संख्या वाढली. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने वाद निर्माण झाला होता. मोटरपंप काढण्यात आले असून आजच खिराडी लावण्यात येणार आहे.- दीपक भोंगाडे, ग्रा.पं. सदस्य, सेवाग्राम.
विहिरीतील पाणी मिळविण्यासाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:17 PM
लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल ...
ठळक मुद्देआदर्शनगरातील प्रकार : वेळप्रसंगी उडते शाब्दिक चकमक