वर्धा : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना व्होटर स्लिप वाटण्यास मनाई केली असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारूलता टोकस यांनी निवडणूक चिन्ह व स्वत:चा फोटो असलेल्या व्होटर स्लिप देवळी भागात वाटल्या. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. प्रशासनाच्या वतीनेच व्होटर स्लिप देण्यात होत्या. मात्र टोकस यांनी अशा व्होटर स्लिप छापल्या. यावर प्रकाशक म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांचा उल्लेख आहे.
भाजप जिल्हाध्यक्षाची काँग्रेसविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:16 PM