लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-वर्धा-यवतमाळ हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे. नागपूर-यवतमाळ थेट रेल्वेशी जोडले न गेल्याने रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण असतो. ही बाब लक्षात घेत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची घोषणा केली. हा रस्ता लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याची वचनपूर्ती होत असून बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ या महामार्ग विकास कामाचे शुक्रवारी खा. तडस यांनी निरीक्षण केले. यावेळी ते बोलत होते. शिरपूर, भिडी, इसापूर, देवळी, सालोड आदी अनेक ठिकाणचे स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्या. विकास कामाचा आढावा घेता यावा या दृष्टीकोनातून हा निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्थानिक नागरिकांचे प्रश्न लवकर मार्गी लागावे म्हणून अधिकाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय साधावा, अशा सूचना खा. तडस यांनी अधिकाºयांना दिल्या यानंतर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या संपूर्ण पाहणी कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक मेंढे, भारतीय प्रबंधक गंडी, दिलीप बिडकॉन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रिजवी, तलवार, भानुप्रताप सिंग सोबतच शिरपूर, भिडी, इसापूर, देवळी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. निरीक्षणानंतर त्यांनी याबाबतची माहिती ना. नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर यांना देत चर्चा केली. देऊळगावकर यांनीही खा. तडस यांच्या दौºयाच्या अनुषंगाने भूमी अधिग्रहणाबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
बुट्टीबोरी ते यवतमाळ महामार्ग वेळेत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:52 PM
नागपूर-वर्धा-यवतमाळ हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे. नागपूर-यवतमाळ थेट रेल्वेशी जोडले न गेल्याने रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण असतो. ही बाब लक्षात घेत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची घोषणा केली.
ठळक मुद्देखासदारांनी केले रस्त्याच्या कामाचे निरीक्षण